बुधवार दि १४ जानेवारी २०२६
मेष:
आज आपणास सांसारिक बाबींचा विसर पडेल. गूढ, रहस्यमय विद्या ह्याची गोडी लागेल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळविण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. बोलण्यावर संयम ठेवा म्हणजे अनर्थ होणार नाही. हितशत्रूंचा त्रास होईल. आज शक्यतो नवीन कार्य सुरू करू नका.
वृषभ:
आज आपणास वैवाहिक जवळीक साधता येईल. कुटुंबीयांसह सामाजिक समारंभासाठी बाहेर फिरणे किंवा सहलीला जाणे झाल्याने वेळ आनंदात जाईल. शरीर व मनाला प्रसन्नता वाटेल. सार्वजनिक जीवनात यश व कीर्ती मिळेल. व्यापारी आपल्या व्यापारात विकास करू शकतील. भागीदारीत लाभ होईल. अचानक धनलाभ होईल. विदेशातून बातम्या मिळतील.
मिथुन:
आज आपली अपूर्ण कामे पूर्ण होतील. त्यात मनासारखे यश मिळेल. घरातील शांती व समाधानाचे वातावरण मनाला प्रसन्न ठेवेल. प्रकृती उत्तम राहील. आर्थिक लाभ होईल. कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील. सावधानता बाळगा.
कर्क:
आजचा दिवस शांततेत घालवावा लागेल. शारीरिक व मानसिक दृष्टया उद्विग्नता राहील. अचानक पैसा खर्च होईल. प्रेमीजनांत वाद – विवाद होऊन रुसवे- फुगवे होतील. नवीन कार्यारंभ अथवा प्रवास न करणे हितावह राहील.
सिंह:
आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. घरात वाद होतील. कुटुंबात अशी एखादी घटना घडेल की त्यामुळे दुःख होईल. अस्वस्थ रहाल. मन व्यग्र राहील. नकारात्मक विचारांमुळे त्रास होईल. शांत झोप लागणार नाही. अती संवेदनशील व्हाल. नोकरीतील वातावरण चिंताग्रस्त राहील. संपत्तीच्या व्यवहारात सावध राहावे लागेल.
कन्या:
आज कोणत्याही कार्यात विचारपूर्वकच सहभागी व्हावे. बरोबरीच्या लोकांमध्ये वेळ चांगला जाईल. भावनात्मक संबंधातून हळवे व्हाल. आप्तेष्ट व मित्रांचा सहवास घडेल. भावंडाकडून फायदा होईल. शत्रूचा सामना करू शकाल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल.
तूळ:
आज आपली मानसिकता नकारात्मक राहील. रागाच्या भरात वाणीवर संयम न राहिल्याने कुटुंबीयांशी मतभेद होतील. वायफळ खर्च होईल. आरोग्य बिघडेल. मनात ग्लानी निर्माण होईल. अवैध प्रवृत्तीत सहभागी होऊ नये. विद्यार्थ्यांना अभ्यासात व्यत्यय येतील.
वृश्चिक:
आजचा दिवस साधारणच आहे. तन – मनाला सुख – आनंद मिळेल. कुटुंबियांसह उत्साहात व आनंदात वेळ घालवाल. मित्रांकडून भेटवस्तू मिळाल्याने मनाला आनंद होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. एखादी आनंददायी बातमी मिळेल. प्रवास सुखद होतील. उत्तम वैवाहिक सुख उपभोगता येईल.
धनु:
आज आपल्या रागामुळे कुटुंबीय व इतर लोकांशी आपले संबंध दुरावतील. आपले बोलणे व वागणे हे एखाद्या वादाचे कारण ठरेल. खर्च होईल. न्यायालयीन कामकाजात दक्षतेने पाऊल उचलावे. निरुपयोगी कामांवर आपली शक्ती खर्च होईल.
मकर:
आज विविध क्षेत्रातून लाभ होण्याचा दिवस असल्याने सामाजिक कार्यांतून लाभ होईल. मित्र व स्नेही यांच्या भेटीतून लाभ होईल. विवाहोत्सुकांचे विवाह सहज जुळतील. शुभ प्रसंगाचे आयोजन घडेल. पत्नी व संततीचा सहवास लाभेल. खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. शेअर बाजारातून फायदा होईल.
कुंभ:
आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. प्रत्येक काम सहजपणे पार पडेल. त्यामुळे आनंदी राहाल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण राहील. त्यामुळे मोठे यश मिळू शकेल. वरिष्ठ व वडीलधार्यांचे आशीर्वाद मिळाल्याने मनावरील ताण कमी होईल. गृहजीवन आनंदी राहील. मान – मरातब वाढतील.
मीन:
मनातील दुःख व अशांतता ह्याने आजच्या दिवसाची सुरुवात होईल. शारीरिक थकवा जाणवेल. वरिष्ठांशी वाद संभवतात. संततीविषयी काळजी सतावेल. निरर्थक खर्च होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद टाळा. नशिबाची साथ लाभणार नाही. मनात नकारात्मक विचार येतील.


