20.3 C
New York
Saturday, August 23, 2025

Buy now

spot_img

रक्षाबंधनच्या पहाटे २० वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

परराज्यातील एक तरुणी कामाच्या निमित्तानं आपल्या महाराष्ट्रात येते. त्यातही ती गुन्हेगारीनं बदनाम झालेल्या बीडच्या परळीत येते. अन् तिथे तिला अनुभव येतो तोही बीडच्या गुन्हेगारीला साजेसा असा.मोठी स्वप्नं उराशी बाळगून आलेल्या तरुणीवर बीडमध्ये एका तृतीयपंथीयाने सामूहिक बलात्कार घडवून आणला.

 

बीडमधल्या एका तृतीयपंथीयाच्या मदतीनं तिघांनी एका परप्रांतातून आलेल्या २० वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. त्या तिघांसह तृतीयपंथी व्यक्तीवरही अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गु्न्हाही दाखल करण्यात आला आहे. त्याचं झालं असं की, मूळ हैदराबादची असलेली ही तरुणी मुंबईत घरगुती साफसफाईचं काम करायची. सुट्टीसाठी हैदराबादला म्हणजे मूळ घरी रेल्वेनं निघाली होती. पण, भूक लागली म्हणून परळीत उतरून एका हॉटेलमध्ये जेवायला गेली. तिथेच तिच्यावर तृतीयपंथीयाची काळी नजर पडली.

 

पूजानंही गोडगोड बोलत, तिची गरज समजून घेतली आणि तिला कामाचं आमिष दाखवलं. जिथे देव बनून ती तृतीयपंथी तिला मदत करू शकली असती तिथे या तृतीयपंथी पूजानं मात्र वाईट रस्ता धरला. आणि त्या तरुणीचं होत्याचं नव्हतं केलं. पूजानं या तरुणीला आपल्या साथीदारांच्या हवाली केलं आणि त्या तिघा नराधमांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. सतीश मुंडे (राहणार डाबी, तालुका-परळी) आणि मोहसीन पठाण (राहणार- शिवाजीनगर, परळी) या दोघांनी आधी तिला काम दाखवू म्हणून बाईकवर बसवून अस्वलआंबा शिवारात नेलं.

 

त्या शिवारालगतच्या मंदिराशेजारी भागवत कांदे होताच. त्याच्याच मालकीच्या खोलीत नेऊन या भागवत कांदेसह सतीश मुंडे आणि मोहसीन पठाण यांनी तिला जीवे मारण्याची धमकी देत एकेक करून तिच्या शरीराचे लचके तोडले. हे सगळं करताना तृतीयपंथी पूजा तिथेच होती. गावात सुरु असलेल्या या घृणास्पद प्रकाराची माहिती एका सजग नागरिकाला कळाली.

 

त्याने तात्काळ ११२ या हेल्पलाईनवर कॉल करून पोलिसांना या घटनेची माहिती दिली. या माहितीची गांभीर्याने दखल घेत परळी ग्रामीण ठाण्याचे सहाय्यक फौजदार टोले यांनी थेट अस्वलआंबा गावातलं ते शिवार गाठले आणि पीडितेची यातून सुटका केली. यावेळी पोलिसांना पाहताच तृतीयपंथीय पूजाने घटनास्थळाहून पळ काढला. मात्र सतीश मुंडे, मोहसीन पठाण आणि भागवत कांदे यांना पकडून त्यांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले.

 

बरं हे घडलं कधी आणि कुठे तर, रक्षाबंधनच्या पहाटे म्हणजे शनिवारी पहाटे बीडच्या परळीतल्या अस्वलआंबा शिवारात. जिथे बहीण भावाच्या नात्याचा उत्सव साजरा होणार होता त्याच बीडमधल्या परळीत तिघे नराधम एका बहिणीचे लचके तोडत होते. या घटनेची माहिती मिळताच अस्वलआंबा गावासह परळी तालुक्यात खळबळ माजली. तरी, गुन्हेगारी, गुंडगिरीचं आव्हान असणाऱ्या एसपींसमोर बीडमधल्या महिला सुरक्षेचा मुद्दाही आ वासून उभा आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles