20.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

निलेश लंकेंचा शरद पवार गटात प्रवेश होणार? आठ महिन्यात निर्णय बदलण्याची वेळ?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

कोराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी आठ ते नऊ महिन्यांपूर्वी अजित पवारांसोबत जात शरद पवार गटाला सोडचिठ्ठी दिली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी पक्षबदल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.सोमवारी सकाळी शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती आहे.

 

पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांना शरद पवार गटाकडून अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान पुण्यात शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याचवेळी लंके प्रवेश करतील, असं सांगितलं जात आहे.

अमोल कोल्हेंनी दिली होती साद

दरम्यान, नुकतंच काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हे यांनी जाहीर कार्यक्रमामधून आमदार निलेश लंके यांना साद घातल तुरारी हातात घ्या, असं आवाहन केलं होतं. त्यावर निलेश लंके यांनी, नक्कीच याबाबत विचार करु, अशी साद दिली होती. अखेर सोमवारी लंके यांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश होत आहे.

राधाकृष्ण विखेंवर शिर्डीची जबाबदारी

भाजपने शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या जागेची जबाबदारी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर सोपविली आहे. जागा वाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात असताना आज भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ही जागा भाजपला द्यावी, अशी मागणी केल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या. दरम्यान खासदार सदाशिव लोखंडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी रविवारी तातडीने मुंबईकडे रवाना झाले होते.

 

गेल्या काही दिवसांत विखे पाटलांनी लागोपाठ दोन वेळा दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत अहमदनगर लोकसभा जागेबरोबरच त्यांच्यावर जबाबदारी असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाची देखील चर्चा झाली की काय, याबाबत तर्क लढवले जात आहेत. त्यापाठोपाठ आज मूळ भाजपचे असलेले माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, साई संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे आणि विखे समर्थक माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके, या तीन महत्त्वाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पत्रकर परिषद घेतली. या मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघांत भाजपची ताकद आहे. विविध सर्वेक्षणांच्या माध्यमातून ही बाब पुढे आली आहे. भाजपकडे उमेदवार देखील आहेत. त्यामुळे ही जागा भाजपला मिळावी, अशी मागणी केली. त्यामुळे महायुतीत सर्व काही अलबेल नसल्याचे चित्र पाहायला मिळाले.

 

मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या सोबत आलेल्या खासदारांना उमेदवारी देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे लोखंडे यांची उमेदवारी निश्चित समजली जात होती. मात्र शिवसेनेला किती जागा मिळणार, याबाबत निश्चित माहिती नसल्याने या गटातील खासदारांत अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री शिंदे यांना भेटण्यासाठी लोखंडे तातडीने मुंबईकडे रवाना झाले. पाठोपाठ भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन या जागेवर दावा सांगितला.

सर्वेक्षण ठरविणार जागा कुणाची ?

शिर्डी लोकसभा मतदारसंघात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रभाव ही भाजपची जमेची बाजू आहे. तथापि, अद्याप भाजपकडून अन्य संभाव्य उमेदवाराचे नाव चर्चेत नाही. शिंदे गटातील उमेदवारांना गरज असेल तेथे कमळ हे चिन्ह घेऊन निवडणूक लढविण्याची मुभा यापूर्वी देण्यात आल्याचे सांगण्यात येते. हा पर्याय लोखंडे यांना खुला असू शकतो. मात्र सर्वेक्षणात काय चित्र समोर येईल, यावरून ही जागा कुणाकडे जाईल, हे ठरेल असा दावा भाजपचे पदाधिकारी करीत आहेत.

 

सुजय विखेंना आव्हान

दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्याचे विद्यमान भाजप खासदार सुजय विखे यांना निलेश लंके यांचं तगडं आव्हान मिळण्याची शक्यता आहे. निलेश लंके यांनी शरद पवार गटामध्ये आज प्रवेश केला तर त्यांच्या उमेदवारीचीही घोषणा होण्याची शक्यता आहे. अगदी आठ ते नऊच महिन्यामध्ये लंकेंना माघारी खेचण्यात शरद पवारांना यश येत आहे. राज्यातील आणखी बडे नेते शरद पवारांच्या संपर्कात असल्याचं बोललं जातंय.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles