23.8 C
New York
Saturday, July 12, 2025

Buy now

spot_img

गुणरत्न सदावर्ते यांना सोलापुरातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

लोकसभा निवडणुकीचे वारे देशात जोरदार वाहू लागले आहेत. राज्यातील प्रमुख जागांवर महायुती, महाविकास आघाडीत खलबते सुरू असताना, सोलापूरच्या जागेबद्दलही चढाओढ सुरू आहे.

भाजपकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांची नावे पुढे येत असताना, प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांना सोलापुरातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपकडूनच सदावर्ते यांच्या नावाचा विचार केला जात असल्याचे समजते. सोलापुरात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे मैदानात उतरणार आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून अद्याप उमेदवार निश्चित झालेला नाही. सोलापुरातील तेलगू भाषिकांचा प्रभाव पाहता मूळचे तेलगू भाषिक असलेल्या सदावर्ते यांना उमेदवारी देण्यासंदर्भात भाजपने विचार सुरू केला आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles