3.6 C
New York
Monday, January 13, 2025

Buy now

spot_img

ग्रामपंचायतीचा रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

राज्य निवडणूक आयोगाने जानेवारी ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित व सन २०२२ मध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे निवडणूक न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणूकांसाठी संगणकप्रणालीव्दारे तसेच ग्रामपंचायतीतील रिक्त जागांच्या पोट निवडणूकांसाठी पारंपारीक पध्दतीने राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम निश्चित करुन दिलेला आहे.

 

सार्वत्रिक/पोट निवडणूकीसाठी आदर्श आचारसंहिता अमलात आलेली आहे. करीता निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने बीड जिल्हयातील १८६ सार्वत्रिक, १७ सदस्यांच्या जागांसाठी व ०२ सरपंच पदासाठी पोट निवडणूक ग्रामपंचायतींसाठी रविवार दिनांक ०५.११.२०‌23 रोजी सकाळी ०७.३० ते ०५.३० पर्यंत मतदान होणार आहे. तसेच मतमोजणी दिनांक सोमवार दिनांक ०६.११.२०२३ रोजी ठिकाण व वेळ जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार होईल. तसेच निवडून आलेल्या सदस्यांची नावे दिनांक गुरुवार दिनांक ०९.११.२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात येतील. त्यासाठी कायदा व सुव्यवस्थांचा प्रश्न उदभवु नये आणि निवडणूका व मतमोजणी खुल्या वातावरणात पार पडाव्यात त्या दृष्टीने

कायद्याची तरतुद लक्षात घेता निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पडणे आवश्यक आहे.

मतदान केंद्राच्या इमारती गळणार नाहीत व मतदान केंद्रावर जाण्यासाठी मतदान पथकास कुठल्याही कारणामुळे अडचण येणार नाही याची जबाबदारी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) व संबंधित बांधकाम विभागाचे राहील. मतदान केंद्र व मतमोजणीच्या वेळी पुरेसा बंदोबस्त पुरविणे व प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची जबाबदारी पोलीस अधिक्षक, यांची राहिल.

तर निवडणूक असलेल्या ठिकाणी आचारसंहितेची अंमलबजावणी पथकाची स्थापना, तालुक्यातील आचारसंहिता अंमलबजावणी कक्षाची स्थापना तसेच आचारसंहिता भंगाच्या तक्रारीचा दैनंदीन अहवाल पाठविणे संबंधित तहसिलदार याची जबाबदारी राहील.

मतदानाच्या आदल्यादिवशी, मतदानादिवशी, मतमोजणीच्या दिवशी विद्युत पुरवठा सुरळीत राहील याची

जबाबदारी अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ यांची राहील. मतदानाच्या आदल्यादिवशी, मतदानादिवशी, मतमोजणीच्या दिवशी जिल्हयातील सर्व दारुविक्रीच्या अनुज्ञप्ती बंद राहतील, जबाबदारी अधिक्षक राज्यउत्पादन शुल्क, यांची राहील. मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद ठेवण्याची जबाबदारी संबंधित उपनिबंधक, सहकारी संस्था, यांची राहील.

 

निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे भरल्यापासून होणाऱ्या दैनिक खर्चाची माहीती संबंधित तहसिल कार्यालयातील खर्च तपासणाऱ्या पथकास सादर करणे जरुरी आहे. तसेच मतमोजणी संपल्यानंतर पुढील ३० दिवसाच्या आत खर्चाचा हिशोब विहीत शपथपत्रासहीत सादर करण्याची जबाबदारी संबंधित उमेदवार यांची राहील. तसेच मुदतीत खर्च सादर न केल्यास त्या उमेदवारांना निरर्ह करण्यासाठी चे प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी संबंधित तहसिलदार याची राहील.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles