13.9 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

पत्रकार संरक्षण कायद्याची बीडमध्ये होळी; पत्रकारांवरील वाढत्‍या हल्‍ल्‍याचा निषेध

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड l प्रतिनिधी 

पत्रकारांना संरक्षण मिळावे, यासाठी पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आल्‍यानंतरही पत्रकारांवरील हल्‍ले वाढतच राहिले आहेत. जबाबदार लोकप्रतिनिधींकडूनही पत्रकारांवर हल्‍ले होत असल्‍याने त्‍या निषेधार्थ बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दि. १७ ऑगस्‍ट रोजी दुपारी १०.३० वाजता बीड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करुन निदर्शने करण्यात आले.

पाचोरा जि.जळगाव येथील पत्रकार संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांनी दिलेल्या अर्वाच्च शिव्या आणि नंतर त्यांच्यावर भ्याड करण्यात आला. या घटनेनंतर मराठी पत्रकार परिषदेची तात्‍काळ बैठक होवून परिषदेचे मुख्य विश्वस्‍त एस.एम.देशमुख यांनी पाचोर्‍यातील घटनेची सविस्तर माहिती देऊन सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. त्‍यानुसार राज्यातील बहुतांशी पत्रकार संघटना एकत्र आल्‍या 17 ऑगस्ट रोजी राज्यभर निदर्शने करण्याचे ठरले. पत्रकारांचे संरक्षण करण्यास निष्प्रभ ठरलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

 

महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. राज्यात गेल्या वर्षभरात 46 पत्रकारांवर हल्ले झाले आहेत. पोलीस पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ करत असल्याने हा कायदा सर्वार्थाने कुचकामी ठरत आहे. यामुळेच पत्रकार संरक्षण कायदयाची होळी करण्यात आली.

 

यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य विलास डोळसे, विभागीय संघटक सुभाष चौरे, जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा समनवक अभिमन्यू घरत, जिल्हा उपाध्यक्ष रवि उबाळे, संपादक राजेंद्र होळकर, संपादक प्रचंड सोळुंके, संपादक दत्ता नरनाले, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख संजय हंगे, मंगेश निटूरकर, अनिल अष्टपुत्रे, रेहान शेख, संतोष केजकर, लक्ष्मण नरनाले, दत्ता आजबे, लक्ष्मण गायकवाड यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles