Home क्राईम गर्लफ्रेंडचे लग्न दुसऱ्यासोबत ठरताच बॉयफ्रेंड संतापला; नवरदेवास पाठवला दोघांचा नको त्या अवस्थेमधला...

गर्लफ्रेंडचे लग्न दुसऱ्यासोबत ठरताच बॉयफ्रेंड संतापला; नवरदेवास पाठवला दोघांचा नको त्या अवस्थेमधला व्हिडिओ

0

छत्रपती संभाजीनगर |

छत्रपती संभाजीनगर येथून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. एका तरुणीचे ज्या मुलाशी लग्न ठरले होते त्यालाच तीचा अश्लिल व्हिडीओ पाठवण्यात आला आहे. तरुणीच्या आधीच्या प्रियकराने हे किळसवाणं कृत्य केलं आहे. या खळबळजनक घटनेमुळे पीडित तरुणी पुरती भयभीत झाली आहे. तसेच आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, वर्षभरापासून प्रेमात असलेली तरुणी दुसऱ्या मुलासोबत लग्न करणार असल्याचे कळताच त्या तरुणाने तिच्यासोबत एकांतात मोबाइलवर बनवलेला व्हिडिओ आणि काही छायाचित्रे इन्स्टाग्रामवरशेअर केले. एवढेच नव्हे तर तरुणीच्या आत्याच्या मुलाला फोन करुन त्याने शिवीगाळ देखील केली. हा सर्व प्रकार 1 ते 24 मार्चदरम्यान घडला.

पीडितेने या बाबत माहिती मिळताच कुटुंबीयांसह एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केलाय. अरबाज खान असे आरोपीचे नाव आहे.

तरुणीच्या घरी लग्न ठरल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. लग्नाची लगबग सुरू असतानाच तिच्या कुटुंबाला या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात त्यांचा एक भूतकाळ असतो. मात्र तो भूतकाळ अशा पद्धतीने संकट होऊन उभा राहील याची तरुणीला काहीच कल्पना नव्हती.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version