21.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

इंग्रजां पेक्षा आपला देश आपल्याच राजकारणी लोकांनी जास्त लुटला- अभिनेते सयाजी शिंदे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

‘झाड तोडणाऱ्यांना दहशत बसेल असे मजबूत कायदे करा..वन कायदे रिवाईस झाले पाहिजे..’ अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचं सांगितलं आहे. यावेळी बोलताना वृक्ष लागवडीसह इतर 70 वर्षाचा हिशोब काढला तर इंग्रजां पेक्षा आपला देश आपल्याच राजकारणी लोकांनी जास्त लुटला असा आरोप सीने अभिनेते सयाजी शिंदे यांनी केला आहे.

बीड जिल्ह्यात काही ठिकाणी वृक्षलागवड करण्यात आली. या कार्यक्रमात सयाजी शिंदे सहभागी झाले होते. तेव्हा त्यांनी भारतात घटणाऱ्या वृक्षक्षेत्रावर आपलं मत मांडलं आहे.

निसर्गाच्या बाबतीतील कायदे हे रिवाईज व्हायला पाहिजेत आणि सरकारने सुद्धा गंभीरतेनं घेतलं पाहिजे. झाड तोडणाऱ्यांना दहशत बसेल असे मजबूत कायदे असले पाहिजेत.शासकीय कर्मचारी असो वा सामान्य नागरिक वृक्षतोडी संदर्भात कठोर कायदे करा अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. त्याबरोबरच देशातील भ्रष्टाचार या संदर्भात भाष्य करताना आणि राजकारण संदर्भात बोलताना सयाजी शिंदे म्हणाले की बऱ्याच जणांना खूप पैसे कमवण्याचा रोग जडलेला आहे.. नोकरी व्यतिरिक्त पैसा कमवून हा रोगच आहे असे देखील सयाजी शिंदे म्हणाले. विकासाच्या नावाखाली रस्त्याच्या कडे ते शंभर शंभर वर्षाचे वृक्ष तोडणे हे चुकीच आहे हे वृक्ष वाचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

असं मत देखील सयाजी शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. बीड जिल्ह्यातील वन क्षेत्र वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे.. रस्ते विकास आणि रुंदीकरनासाठी होणारी झाडाची कत्तल थांबवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचे सयाजी शिंदे यांनी यावेळी सांगितलं. तसंच ‘जगातील सर्वात मोठा सेलिब्रिटी झाडं आहे’ असं मत त्यांनी यावेळी बोलताना मांडलं आहे.

सयाजी शिंदे आपल्या चित्रपटांसोबतच आपल्या सामाजिक कार्यासाठीदेखील ओळखले जातात. सयाजी शिंदेनी झाडे लावण्याचा आणि वृक्षतोड रोखण्याचा विडा उचलला आहे. ते सतत झाडे लावा, झाडे जगवा अशा उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करत असतात. त्यांच्या या उपक्रमाला ठिकठिकाणचे नागरिक चांगला प्रतिसाद देतात.

घर बंदूक बिर्याणी चित्रपटाचे प्रमोशन 

‘घर बंदूक बिरयानी’  या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. नागराज मंजुळे, आकाश ठोसर आणि सयाजी शिंदे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा येत्या ७ एप्रिलला रिलीज होत असल्याने चित्रपटाचे प्रमोशन सध्या सुरू असल्याचे अभिनेते सयाजी शिंदे यांनी सांगितले.

टीझर व ट्रेलरनंतर या चित्रपटाविषयीची चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहेच. आशेच्या भांगेची नशा भारी…, अशी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पोलीस, डाकू यांच्यात चकमक होताना दिसते. नक्की कशावरून ही चकमक सुरु आहे आणि घर, बंदूक आणि बिरयानीचा नेमका काय संबंध, याचं उत्तर प्रेक्षकांना 7 एप्रिल रोजी मिळणार आहे. सर्वांनी चित्रपट पाहावा असे आवाहन त्यांनी केले.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles