7 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img

गुटख्याच्या गोदामावर पोलिसांचा छापा; ३३ लाखाचा गुटखा जप्त

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत गुटख्याच्या गोदामावर छापा टाकण्यात आला आहे. यात जवळपास ३० लाखांपेक्षा अधिक गुटखा जप्त केला आहे. तसेच याचा म्हाेरक्याही जाळ्यात अडकल्याचे सांगण्यात येत आहे. या गुटख्याची पाळे’मुळे’ परराज्यापर्यंत आहेत. आज पहाटेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात गुटख्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याचे दिसत आहे. मागील आठवड्यात सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने परळी तालुक्यात जवळपास ३३ लाख रूपयांचा गुटखा जप्त केला होता. त्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने गेवराई शहरात सव्वा लाख रूपयांचा गुटखा जप्त केला. त्यानंतर आता एलसीबीने मंगळवारी पहाटे पिंपळनेर परिसरातील एका गोदामावर छापा मारून तब्बल ३० लाख रूपयांपर्यंत गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणात एलसीबीचे अधिकारी पिंपळनेर पोलीस ठाण्यात ठाण मांडून असून दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles