15.9 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

गुढीपाडवा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

पुणे |

हिंदू धर्मात गुढीपाडव्याला अधिक महत्त्व आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून मराठी नववर्षाची सुरुवात होते. या दिवशी गुढीपाडव्याचा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. विशेष म्हणजे गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या मुहूर्तावरती केलेले कोणतेही चांगले काम किंवा खरेदी ही शुभ मानली जाते. यामुळे गुढीपाडव्याला विशेष महत्त्व असते. 

गुढीपाडवा, ज्याला संवत्सर पाडो म्हणूनही ओळखले जाते, हा भारतातील महाराष्ट्र राज्यात प्रामुख्याने साजरा केला जाणारा वसंतोत्सव आहे. यावर्षी गुढीपाडवा 22 मार्च 2023 रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी विविध प्रतीकांनी ही गुढी सजवली जाते. यावर्षी गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे, गुढी कशी उभारायची, पूजेसाठी मुहर्त काय असेल याची माहिती आपण जाणून घेणार आहोत..

काय आहेत गुढीपाडव्याच्या आख्यायिका? 

पुराणात गुढीपाडव्याची एक आख्यायिका आहे. ब्रह्मदेवांनी गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती केली होती. म्हणून गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. तसेच गुढीपाडव्याच्या दिवसापासून वसंत ऋतूला देखील सुरुवात होते. पुराणातील अजून एक आख्यायिका आहे. रामायण काळामध्ये प्रभू श्री राम जेव्हा रावणाचा वध करून पुन्हा अयोध्याकडे आले होते. त्यावेळेस अयोध्यावासीयांनी गुढीपाडव्याच्या दिवशी गुढ्या उभारून श्रीरामांचे स्वागत केले होते. अशा या गुढीपाडव्याबद्दल पुराणामध्ये या दोन आख्यायिका आहेत.

काय आहे शुभ मुहूर्त कधी उभारणार गुढी 

यावर्षी 22 मार्च 2023 रोजी गुढीपाडवा हा सण येत असून सकाळी 6.29 ते 7. 39 या मुहूर्तावरती सर्वांनी गुढी उभारावी. ही गुढी आपल्या घराकडे तोंड करून उभरावी. या गुढीवरती तांब्याचा कलश, नवीन वस्त्र, कडूलिंबाचा पाला, साखरगाठ बांधलेली असावी. त्यावर हळदीकुंकू वाहावे. गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांनी आपल्या घरी पुरणपोळी अथवा इतर गोडधोड पदार्थ बनवावेत आणि त्याचा गुढीला आणि देवाला नैवेद्य दाखवावा.

कडुलिंबाच्या पाल्याला आहे विशेष महत्त्व 

गुढीपाडव्याच्या दिवशी सोने खरेदीला आणि कडुलिंबाच्या पाल्याला विशेष महत्त्व असते. या दिवशी आपण गुढीला कडूलिंबाचा पाला बांधतो. तसेच या दिवशी गुळ आणि कडुलिंबाच्या पाल्याचा प्रसाद देखील खाल्ला जातो. याबाबत अशी मान्यता आहे की, कडुलिंब हे आरोग्याला चांगले असते आणि गुढीपाडव्याच्या दिवशी हा पाला खावा. तसेच उन्हाळा सुरू असल्यामुळे कडुलिंबाच्या पाल्याने शरीर शांत आणि शुद्ध होण्यास उपयुक्त असते.

वातावरणात वाढलेल्या उन्हाची काहिली कमी करण्यासाठी गुढीमध्ये कडूलिंबाची पाने लावली जातो. प्राचीन काळापासून चैत्र शुद्ध प्रतिपदेला ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर हे कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. यामुळे पचनक्रिया सुधारणं, पित्ताचा नाश करणं, त्वचारोग बरं करणं, धान्यातील किड थांबवणं हे सर्व यामुळे शक्य होतं. कडुनिंबामध्ये अनेक गुण असल्यामुळे आयुर्वेदातही याला खूप महत्त्व आहे. शरीराला थंडावा देणारी कडुनिंबाची पानं आंघोळीच्या पाण्यात घालून आंघोळही केली जाते. ती वाटून खाल्ल्यामुळे आरोग्याला चांगला लाभ होतो.

गुढीपाडव्याचे महत्त्व 

गुढीपाडवा हा सण साडेतीन मूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. या मुहूर्तावरती कोणतेही चांगली खरेदी केलेली अथवा कोणतेही चांगले काम सुरू केले तर ते दीर्घायू टिकून राहते. यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी सोने खरेदी केले जाते. ज्यांना व्यवसायात वृद्धी करायची असेल त्यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करावा, असं म्हटलं जातं.

आजच्या आधूनिक युगातही या सणाला ऐतिहासिक सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. म्हणूनच पुढच्या पिढीसाठी गुडी पाडवा महत्व जाणून घेणं फार गरजेचं आहे. वास्तविक प्रत्येक सण साजरा करण्यामागे पुर्वजांचे काही उद्देश असतात. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरूवात होते. त्यामुळे वातावरणात बदल झालेले असतात. जुनी सुकलेली पानं गळून झाडांना नवी पालवी फुटते, आंब्याला मोहोर येतो याचं प्रतिक म्हणून गुढीला आंब्याची डहाळी बांधली जातात. पूर्वीपासून या नैसर्गिक बदलाचे स्वागत करण्याची पद्धत असावी. नवीन वर्षाच्या स्वागतामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

गुढीला कलश उलटा का असतो?

गुढीवरती जो आपण कलश लावतो तो कलश हा ब्रम्हध्वजाचे प्रतीक म्हणून मानले जाते. ज्या कलशातून साखरगाठ नवीन वस्त्रे कडुलिंबाचा पाला अशा विविध गोष्टी आपल्या घरी समृद्धी यावी यासाठी बांधल्या जातात. या सर्वांचे प्रतीक म्हणून हा कलश उलटा ठेवला जातो.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles