आष्टी | प्रतिनिधी
मतदार संघातील शिरूर कासार तालुक्यातील ब्रह्मनाथ येळंब आणि निमगाव मायंबा येथील कोल्हापूर बंधारे यांचे रूपांतरण मध्ये करण्याचा निर्णय कॅबिनेट पर्यंत आणण्याचे काम आम्ही केले आहे या कामासाठी मी 2014 पासून प्रयत्न करत असून त्यानंतर 2022, 2023,2024, या कालावधीमध्ये देखील पाठपुरावा केल्यामुळे हा विषय कॅबिनेट मध्ये आला आणि कॅबिनेट मंत्री असल्यामुळे नामदार पंकजाताईंनी हा विषय पाहिला आणि वर्तमानपत्रात आष्टी मतदार संघाला गिफ्ट अशी बातमी छापून आणली केवळ श्रेय घेण्यात साठीच पंकजाताई मुंडे यांनी या गिफ्ट बाबत घोषणा केली आहे वास्तविक पाहता आष्टी मतदारसंघाला कोणत्याही फुकटच्या गिफ्टची आवश्यकता वाटत नाही आम्ही मतदारसंघाच्या विकास कामासाठी सक्षम आहोत या दोन बॅरेजच्या कामाबरोबरच आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघामध्ये आणखीही काही बॅरेजेस मंजूर होणार आहेत त्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करत आहोत दोन बॅरेज सारख्या कामाचे श्रेय घेणे योग्य नाही अशी परखड प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केली आष्टी येथील विशेष पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
आमदार सुरेश धस पुढे म्हणाले कॅबिनेट मीटिंगमध्ये आलेला प्रस्ताव पाहून तुम्ही याचा फायदा घेतलेला आहे या बॅरेजेस च्या रूपांतरणाची श्रेय आमच्या पाठपुराव्यालाच आहे याची माहिती मतदारसंघातील जनतेला आहे या कामासाठी मी सन-2014 पासून प्रयत्न करत असून,यासाठी पहिल्या पासुन पाठपुरावा मी स्वतःकेला आहे. याबाबत दिलेल्या पत्रांचे पुरावे माझ्याकडे आहेत पुरावेही माझ्याकडे आहेत. वास्तविक पाहता पंकजाताई यांनी गिफ्ट द्यायचे होते तर आष्टी पाटोदा आणि शिरूर तालुक्यामधील मोठ्या प्रमाणावर असलेल्या पशुधन आणि दूध उत्पादन मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे पशुवैद्यकीय पशुसंवर्धन महाविद्यालय यांचे गिफ्ट आष्टी मतदार संघाला देणे योग्य होते परंतु आपण त्या विभागाच्या मंत्री झाल्यामुळे आपण ही महाविद्यालय परळी मतदारसंघात घेऊन गेलात परंतु परळी मध्ये किती दूध उत्पादन आहे आणि किती पशुधन आहे याची तुलना करावी आष्टी मतदार संघाला कोणतेही फुकटचे गिफ्ट नको.पंकजाताई यांनी कुठलाही पाठ पुरावा न करता केलेल्या कामांचे गिफ्ट आमच्या मतदारसंघाला देऊ नये.असा खरपुस समाचार आमदार सुरेश धस यांनी ना.पंकजा मुंडे यांचा नाव न घेता घेतला आहे.
पुढे बोलतांना ते म्हणाले,माझ्या मतदार संघातील शिरूर (कासार) तालुक्यातील ब्रम्हनाथ येळंव व निमगाव ता.शिरूर (का) जि.बीड या को.प.बंधा-यांचे बॅरेज मध्ये रुपांतरण करण्याचे कामाचे अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी,जलसंपदा विभागामार्फत कार्यवाही प्रगतीत आहे.सदर कामाच्या प्रस्तावास राज्य तांत्रिक सल्लागार समिती -1. नाशिक यांनी दि. 05/07/2024 रोजी झालेल्या बैठकीत मान्यता दिलेली असून प्रस्ताव शासनास निर्णयार्थ सादर आहे.सदर प्रस्तावास मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मंजुरी आवश्यक आहे.ब्रम्हनाथ येळंब व निमगाव(मायंबा) ता.शिरूर (का) जि. बीड या को.प.बंधा-यांचे बॅरेज मध्ये रुपांतरण करण्याचे काम या प्रस्तावास आगामी मंत्रीमंडळ बैठकीमध्ये हे पत्र मी 13/12/2024 रोजीच दिले होते.यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्या कामाचे कॅबिनेटमध्ये प्रस्ताव घेतल्याचे आपल्या जिल्ह्यातील कॅबिनेट मंत्रीमहोदय यांना समजताच या कामाचे श्रेय घेऊन आष्टी मतदारसंघाला आम्ही केलेले कामे दाखवून आम्हाला गिफ्ट देऊन नये असा खरपूस समाचार आ.सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांचा नाव न घेता घेतला आहे.