18.2 C
New York
Wednesday, October 15, 2025

Buy now

spot_img

चौरंगी लढतीत सुरेश धस यांचा मोठा विजय

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघात विकासासाठी काय निकाल लागतो, याची लोकांना उत्सुकता होती. सुरेश धस हे येथून निवडणुकीच्या रिंगणात होते. विशेष म्हणजे यावेळी निवडणुकीमध्ये त्यांनी जोरदार ताकद लावली होती. चौरंगी लढतीत सुरेश धस यांचा मोठा विजयतर, दुसरीकडे माजी आमदार भिमराव धोंडे यांनी बंडोखोरी केल्याने त्यांच्या विरोधात आव्हान उभं राहिलं होतं. परंतु, सुरेश धस यांनी भिमराव धोंडे यांच्यासह विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे, महाविकास आघाडीचे उमेदवार मेहबूब शेख यांना पराभूत करून बाजी मारली आहे.

जी

सुरेश धस हे 77 हजार मतांनी विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयाने आष्टी तालुका आण्णामय झाला आहे. विशेष म्हणजे पहिल्या फेरीपासून सुरेश धस हे आघाडीवर होते ते विजयापर्यंत कायम राहिले. सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळतंय. सुरेश धस हे सर्व जातीधर्माच्या लोकांना आपले आमदार वाटतात ही त्यांची जमेची बाजू आहे. तसंच, ते युवकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. लोकप्रियतेच्या बाबतीत महाराष्ट्रात त्यांचा वरचा क्रमांक लागतो.

 

सुरेश धस हे आष्टीमधून विजयी झाले आहेत. मोठ्या लीडने त्यांचा विजय झालाय. सुरेश धस सुरूवातीच्या फेरीपासूनच आघाडीवर होते. सुरेश धस यांचा मतदार संघात मोठी पकड बघायला मिळते. आता सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त केला जातोय.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles