Home बीड बीड विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये रस्सीखेच, कुणाला मिळणार उमेदवारी?

बीड विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये रस्सीखेच, कुणाला मिळणार उमेदवारी?

0

बीड विधानसभा मतदारसंघात अनेक उमेदवार असल्याने महायुतीचा उमेदवार निवडीबाबत चांगलाच कस लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून बीड विधानसभेवर दावा केला गेला असला तरी महायुतीचे घटक पक्ष असलेले भाजप व शिवसेना या जागेसाठी आग्रही असल्याचे दिसून येत आहे. महायुतीतल्या प्रत्येक पक्षाचा उमेदवार दंड थोपटून बसलेला आहे. यामुळे बीड विधानसभेची उमेदवारी कोणाला द्यायची? असा पेच महायुतीत निर्माण झालेला दिसून येत आहे.

 

महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विधानसभा अध्यक्ष योगेश क्षीरसागर हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी काहीही झाले तरी मी निवडणूक लढवणार असल्याची भूमिका याआधीच जाहीर केलेली आहे.

 

 

तर बीड भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा पंकजा मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र मस्के यांनी देखील बैलगाडा शर्यतीत माझा बैलगाडा विधानसभेत धावणार असून त्याला बैल कुठले असतील हे मात्र सांगता येणार नाही, असे म्हणत भाजपला जणू सूचक इशाराच दिला आहे.

 

त्यातच युवासेनेचे मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांनी नुकतेच बीडमध्ये शक्तीप्रदर्शन केले. युवासेनेच्या मेळाव्यातील बॅनरवर शिवसेना शिंदे गटाच्या दोन्ही जिल्हाध्यक्षांचे फोटो न टाकल्याने बीडमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. तर बीड विधानसभेत शिवसेनेचा धनुष्यबाण चिन्ह असेल युवासेना – शिवसेनेमधील गटबाजी मिटवण्यासाठीच मी आलो असल्याचं म्हणत सरनाईक यांना गटबाजीवर पडदा टाकावा लागला होता.चांगले काम करत असेल त्यांची शिफारस आम्ही करतो आणि त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब निर्णय घेतील, असं म्हणत बाजीराव चव्हाण यांच्या बीड विधानसभेच्या उमेदवारी संदर्भात देखील सूचक वक्तव्य पूर्वेश सरनाईक यांनी केलं होत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version