Home Uncategorized वसतीगृहातून बाहेर नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

वसतीगृहातून बाहेर नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

0

केज येथील वसतिगृहात राहून शिक्षण घेत असलेल्या मुलीला बाहेर बोलावून तिला दोघांनी मोटार सायकलवर बसवून एका लॉजच्या पाठीमागे मोकळ्या जागेत नेले. तिथे तिच्यावर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली. ती अल्पवयीन पीडित मुलगी एक महिन्याची गरोदर असल्याचीही माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून सन्नी उर्फ स्वप्नील पाडळे आणि त्याचा मित्र अमोल जाधव याच्या विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी आजोळी राहते. तिच्या शेजारी राहत असलेल्या सनीबरोबर तिची चांगली ओळख आहे. शनिवारी (दि. २१) वसतीगृहाला सुट्टी असल्यामुळे ती आजोळी आईकडे गेली होती. त्यानंतर दि. २४ सप्टेंबर रोजी आईने तिला सकाळी १० वाजता वसतीगृहामध्ये सोडले होते. त्यानंतर सनी पाडळे व अमोल जाधव यांनी वसतीगृहामध्ये जाऊन पीडितेला बाहेर बोलावून घेतले.

 

आणि तुझ्या मामाने तुला सरकारी दवाखाना केज येथे बोलवले असल्याचे सांगितले. त्यानंतर तिला मोटार सायकलवर बसवून केज येथील अंबाजोगाई रोडवरील सुजीत लॉजच्या पाठीमागे नेले. तेव्हा ती सनीला म्हणाली की, “मामा आले नाहीत. मला आता वसतीगृहावर नेऊन सोड. असे म्हणताच तो तिला म्हणाला की, “माझे तुझ्यावर प्रेम आहे. तु मला आवडतेस.” असे म्हणून त्याने तिच्या इच्छेविरूध्द रात्री ९ च्या सुमारास बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तिने आरडा ओरडा केला असता दोघे जण तिथे आले. त्यांनी तिला काय झाले? असे विचारले असता तिने त्यांना आईला फोन लावायचा आहे, असे सांगितले. त्यापैकी एकाच्या मोबाईलवरून तिने आईला घडलेल्या घटनेबाबत सांगितले.

 

त्यानंतर सनीने तिला दहीफळ फाटा येथे नेऊन सोडले आणि तो तेथून निघून गेला. त्यानंतर पीडित मुलगी पायी चालत घरी गेली. रात्री उशीरा तिने हा प्रकार आई, मामा आणि नातेवाईकांना सांगितला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके करीत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version