8.6 C
New York
Wednesday, January 14, 2026

Buy now

spot_img

बीड जिल्ह्यात १९ जूनपासून पोलिस भरती; 170 पदासाठी आले 8429 अर्ज

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

बीड जिल्ह्यामध्ये येत्या 19 जून पासून पोलीस मुख्यालयावर पोलीस भरती प्रक्रिया सुरू होणार असून पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई आणि बँड्समन पोलीस शिपाई या तीन पदासाठी मिळून 170 जागा असून यासाठी 8429 अर्ज आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेला अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक डॉ.संतोष साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये ही भरती प्रक्रिया होणार असून बीड जिल्ह्यात पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक व पोलीस शिपाई बँड्समन अशा तीन कॅटेगरीसाठी 170 पदे असून यासाठी 8429 अर्ज आलेले आहेत .यातील पोलीस शिपाई या कॅटेगरीच्या 164 पदासाठी 7545 अर्ज ,पोलीस शिपाई चालक पदासाठी 5 जागांसाठी 693 अर्ज तर पोलीस बँड्समनच्या एका जागेसाठी 191 अर्ज आल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. पुढे बोलताना पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर म्हणाले की या उमेदवारांची शारीरिक चाचणी होणार असून पुरुषांसाठी 100 मीटर, 1600 मीटर धावणे व गोळा फेक अशी स्पर्धा राहील तर महिलांसाठी शंभर मीटर धावणे ,800 मीटर धावणे व गोळा फेक अशी स्पर्धा राहील. वाहन चालकासाठी 1600 मीटर धावणे व गोळा फेक तर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे व गोळाफेक अशी स्पर्धा राहील. बँड्समन साठी 100 मीटर , 1600 मीटर धावणे व गोळा फेक याबरोबरच बँड टेस्ट तर वाहन चालकांसाठी वाहन चालवण्याची टेस्ट राहणार आहे .त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे. सध्या पावसाळा असल्याने याचे नियोजन केले असून टेस्ट मागेपुढे होऊ शकते प्रत्येक उमेदवाराला एकाच ठिकाणी अर्ज करता येईल. मात्र बाहेरच्या जिल्ह्यात एस. आर. पी. एफ. साठी कोणी अर्ज केला तर त्याला वेगळी तारीख देण्याची सुविधा आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची तपासणी करावी लागेल .ही भरती दिनांक 19 ते 28 जून दरम्यान होणार असून याच ठिकाणी उमेदवाराला आपले गुण सांगितले जातील .संपूर्ण भरती पारदर्शक पद्धतीने उमेदवारांनी कुठल्याही आमिषाला बळी पडू नये असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे. या पदासाठी महिला उमेदवार उपलब्ध झाल्या नाही तर पुरुष उमेदवारातून निवड केली जाईल. प्रत्येक दिवशी या ठिकाणी वेगवेगळे अधिकारी राहतील तसेच तक्रारी ऐकून घेण्यासाठी ग्रह खात्याचे पोलीस उपाधीक्षक या ठिकाणी हजर असतील .अशी माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles