24.1 C
New York
Friday, July 18, 2025

Buy now

spot_img

मनोज जरांगे यांची ८ जून रोजी नारायणगडावर होणारी सभा रद्द

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे यांची ८ जून रोजी बीडमध्ये होणारी सभा रद्द करण्यात आली असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समनवक ॲड. मंगेश पोकळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अनिल जगताप, दिलीप गोरे, अजित वरपे आदि उपस्थित होते.

तब्बल ९०० एक्करांवर होणाऱ्या या सभेची राज्यभर चर्चा होती. बीडमध्ये सध्या दुष्काळाचं सावट आहे. त्यामुळे पाण्याचं दुर्भिक्ष्य निर्माण झालेलं असून सभेसाठी येणाऱ्या लोकांची असुविधा होऊ नये म्हणून सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

मनोज जरांगे यांची ८ जून रोजी नारायणगडावर सभा होणार होती. या सभेला तब्बल ६ कोटी मराठा बांधव उपस्थित राहतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु आता ही सभा रद्द करण्यात आलेली आहे.

बीडच्या ऐतिहासिक सभेची राज्यभर चर्चा होती. परंतु यंदा बीडवर भीषण दुष्काळाचं सावट आहे. पिण्यासाठी पाणी नाहीये. त्यामुळे सभेसाठी येणाऱ्या लोकांची गैरसोय झाली असती. आता ही सभा जूननंतर होणार आहे.

दरम्यान, या सभेसाठी राज्यातूनच नाही तर परप्रांतातून देखील लोक येणार होते. आता पुढची सभा कधी होणार, याबाबत बैठक होणार आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles