Home ताज्या बातम्या मुंबई आग्रा महामार्गावर बसचा भीषण अपघात ; १० प्रवासी जागीच ठार

मुंबई आग्रा महामार्गावर बसचा भीषण अपघात ; १० प्रवासी जागीच ठार

0

चांदवड |

मुंबई आग्रा महामार्गावर जळगावकडून नाशिकला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १० प्रवासी जागीच ठार झाले असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अपघात इतका भीषण होता की यामध्ये बसची एक बाजू पूर्ण कापली गेली.

यामुळे त्या बाजूला बसलेले प्रवासी रस्त्यावर पडले. यात काहींचा जागीच मृत्यू झाला तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रकला धडकल्यानंतर भीषण अपघात झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, एसटी बस जळगावकडून नाशिकला जात होती. त्यावेळी ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना हा अपघात झाला अशी माहिती समोर येतेय. अपघातात एसटीची एक बाजू कापली गेलीय. घटनास्थळी रक्तामांसाचा चिखल पडला होता. अनेक प्रवासी रस्त्यावर पडले. घटनास्थळावरील दृश्ये अंगाचा थरकाप उडवणारी होते. रस्त्यावर मृतदेह पडले होते. ज्या बाजूला धडक बसली त्या बाजूचे प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. जखमी प्रवाशांना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहूड जवळ एसटी आणि ट्रकचा हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. तर मृतदेहांची ओळख पटवण्यात येत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version