20.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

पंकजा मुंडे यांचे लोकसभा निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या, मी पुढे तुमची काळजी घेते, असे सूचक वक्तव्य भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे. आगामी काळात लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत त्यांनी या माध्यमातून दिले असल्याची चर्चा आता रंगली आहे. पुढील दोन ते तीन दिवसात लोकसभा निवडणुका जाहीर होत आहेत. या निवडणुकीत काळजी घेण्याचे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे. पंकजा मुंडे या लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार असतील, अशी शक्यता गेल्या काही दिवसापासून वर्तवली जात होती. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी केलेले हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.

मी सध्या माजी आमदार तसेच माजी ग्रामविकास मंत्री आहे. त्यामुळे मला तुम्हाला काही देता येत नाही. मात्र, इथे बसलेले अनेक नेते हे आजी आहेत. या आजी नेत्यांना माजी लोकांनीच आजी केले असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. मात्र, ज्यांनी तुम्हाला आजी केले त्यांना विसरू नका, लोकसभा निवडणुकीत मदत करा, पुढे मी तुम्हाला मदत करेल, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी आपल्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत. बीड जिल्ह्यातील शिरूर येथे सिद्धेश्वर देवस्थान संस्थानमध्ये हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाच्या सांगता सोहळ्याला पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे या देखील उपस्थित होत्या. त्या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी उमेदवारीची संकेत दिले आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची नावे अद्याप जाहीर झाली नसली तरी उमेदवारांची यादी जवळपास निश्चित झाली असल्याचे मानले जात आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून प्रीतम मुंडे यांच्या जागी पंकजा मुंडे यांनी निवडणूक लढवावी अशी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची इच्छा आहे. त्यामुळे आगामी काळा जाहीर होणाऱ्या यादीत बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे या भाजपच्या उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांनी उमेदवाराचे संकेत दिले असल्याचे बोलले जात आहे. मी राज्याच्या राजकारणातच राहणार असल्याचे पंकजा मुंडे याधी म्हणाल्या होत्या, मात्र आता भाषणामध्ये त्यांचा सूर बदलला असल्याचे दिसून येत आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles