Home ताज्या बातम्या माझ्या १३ खासदारांची तिकिटं तरी कापू नका, शिंदेंची शहांना विनवणी, पण शहा...

माझ्या १३ खासदारांची तिकिटं तरी कापू नका, शिंदेंची शहांना विनवणी, पण शहा म्हणाले.

0

सर्वच पक्षांचे जागावाटप सुरू असून लोकसभेत आपल्यालाच जास्त जागा मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. असे असताना महायुतीत पक्षांची गर्दी वाढल्यानंतर जागावाटपाचा गोंधळही वाढला आहे.यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची कोंडी झाली आहे.

 

आधी केवळ शिवसेना-भाजप असताना युतीच्या फॉर्म्युलानुसार तिकीटवाटप सहज शक्य होते. परंतु मोदींची ४०० पारची महत्त्वाकांक्षा वाढली, तशी महायुतीत पक्षांची संख्याही वधारली. मात्र आता सगळंच अवघड झालं आहे.

 

यातच एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात भाजपसोबत युतीचे सरकार स्थापन करण्यासाठी त्यांच्यासोबत आलेल्या शिवसेनेच्या सर्व १३ विद्यमान खासदारांना तिकीट मिळावे, यासाठी धडपड करत आहेत. मात्र भाजपा त्यांना या जागा देण्यास नकार देत असल्याची माहिती आहे. यामुळे गुंता वाढला आहे.

 

शिवसेनेच्या १८ पैकी १३ खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले. यंदा भाजपची बार्गेनिंग पॉवरही वाढली आहे. त्यामुळे भाजप ३० जागांवर लढण्यावर ठाम असल्याचे बोलले जाते. शिवसेना यंदाही २२ जागांसाठी अडून बसली होती, शेवटी विद्यमान खासदारांना तरी तिकीट द्या, अशी मागणी शिंदेंनी केली आहे.

 

परंतु भाजपकडून दबाव वाढत असल्याचं बोललं जात आहे. यामुळे आता या जागा देखील त्यांना मिळणार नसल्याची माहिती आहे. त्यांना 8 जागा आणि अजित पवार यांना 4 जागा देण्यात येणार असल्याची माहिती सध्या आहे. यामुळे वातावरण तापलं आहे.

 

दरम्यान, गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर होते. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. एकनाथ शिंदे यांच्या प्रस्तावाला अमित शहा यांनी नकार दिला असल्याची माहिती आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version