१५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असल्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने आज सोमवारी केली.
१३ राज्यांतील ५० राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी तर २ राज्यांतील उर्वरित ६ सदस्यांचा कार्यकाळ ३ एप्रिल रोजी संपणार आहेत.
उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, कर्नाटक, उत्तराखंड, छत्तीसगड, ओडिशा, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांत राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत.