8.8 C
New York
Wednesday, January 14, 2026

Buy now

spot_img

डॉ. सुरेश साबळे यांचे निलंबन मॅटकडून रद्द

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांचे करण्यात आलेले निलंबन गुरुवारी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण अर्थात मॅटने रद्द ठरविले आहे.

 

बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्यावर कंत्राटी भरतीचा ठपका ठेवत आरोग्य मंत्र्यांनी विधीमंडळात त्यांच्या निलंबनाची घोषणा केली होती. त्यानंतर आरोग्य विभागाने त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले. याला डॉ. सुरेश साबळे यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण अर्थात मॅटच्या औरंगाबाद बेंचमध्ये आव्हान दिले होते. याची सुनावणी न्या. पी आर बोरा यांच्यासमोर झाली. सुनावणी दरम्यान डॉ. साबळे यांना निलंबित करण्याइतपत प्रथमदर्शनी पुरावे नसल्याचे सांगत मॅटने सदरचे निलंबन आदेश रद्द केले आहेत. यामुळे आता डॉ. सुरेश साबळे हे पुन्हा जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून काम पाहणार आहेत.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles