23 C
New York
Saturday, July 19, 2025

Buy now

spot_img

पंकजा मुंडे यांच्या व्हिडीओची चर्चा; ‘थोडे मनोगत…’ म्हणत ट्विटरवर पोस्ट

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

राजकारणापासून दोन महिन्याची सुट्टी जाहीर करून राजकीय वातावरणापासून काहीशा दूर असलेल्या भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा एक व्हिडिओ सध्या चर्चेचा बनला आहे.

पंकजा मुंडे यांनी श्रावण सोमवारच्या निमित्ताने एक व्हिडिओ आपल्या समाज माध्यमावर प्रसारित केला असून यात लवकरच आपण जनताजनार्दनाचेही दर्शन घेण्यासाठी व भेटण्यासाठी येणार असल्याचे म्हटले आहे.

 

सध्याच्या राजकीय परिस्थितीत आपण दोन महिन्याच्या सुट्टीवर जात असल्याचे जाहीर केल्यानंतर पंकजा मुंडे या राजकीय वातावरणापासून काहीशा दूर आहेत. मात्र त्यांच्या समाज माध्यमांमधून त्या लोकांशी सातत्याने संवाद साधत आहेतच. त्यांच्या समर्थकांमधून मोठ्या प्रमाणावर ताई, तुम्ही बाहेर या, दौरे करा, भेट घ्या अशा प्रकारचा आग्रह मोठ्या प्रमाणावर सुरूच आहे. या दरम्यान श्रावण सोमवार निमित्ताने पंकजा मुंडे यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये श्रावण महिना व परळीला असलेले महत्त्व सांगतानाच त्यांनी या दोन महिन्याच्या कालावधीत कोणकोणत्या परिस्थितीशी आपण सामोरे जात आहोत याबाबतीतही मतं व्यक्त केले आहे. त्याचबरोबर प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनाप्रमाणेच जनता जनार्दनाच्या दर्शनाचीही आपल्याला आस लागलेली असल्याचे सांगितले आहे.

 

पंकजा मुंडे यांनी लवकरच आपण जनता जनार्दनाचे दर्शन घेण्यासाठी येत असल्याचे म्हटले आहे. परंतु जनतेशी होणारी ही भेट राजकीय पातळीवर नसून ती एक सामाजिक व कौटुंबिक पातळीवरची भेट राहील असं त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान पंकजा मुंडेंचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर समाज माध्यमांवर व्हायरल होताना दिसत असून या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणावर चर्चाही होत आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles