25.2 C
New York
Thursday, June 19, 2025

Buy now

spot_img

माझ्या फोटोचा वापर करून कार्यकर्त्यांची व जनतेची दिशाभूल; माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

आज मुंबई येथे होत असलेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाशी माझा कसलाही संबंध नाही, सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय मी कुठलाही राजकीय निर्णय घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका मी कालच जाहीर केली आहे,तरीही माझ्या फोटोचा वापर करून कार्यकर्त्यांची व जनतेची दिशाभूल व संभ्रम निर्माण करणाऱ्या चुकीच्या जाहिराती व बातम्यांवर कृपया विश्वास ठेवू नये असा खुलासा  माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केला आहे.

पुतण्या डॉ. योगेश यांनी अजित पवार गटाची वाट धरली आहे. त्यांना रोखण्यासाठी सर्व बाजूने प्रयत्न झाले, परंतु यात यश आले नसल्यानेच आज २३ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा जयदत्त क्षीरसागरांसाठी माेठा धक्का असणार आहे.

जयदत्त क्षीरसागर यांनी राजकीय भूमिकेबाबत मौन कायम ठेवलेले आहे. राज्याप्रमाणेच जिल्ह्यातही राजकीय घडामोडी गतीने होत असल्याचे सध्या पाहावयास मिळत आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles