20.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

लाचखोर तहसिलदाराकडे सापडले एवढे घबाड. नाशिक एसीबीचा कसून तपास

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

महसूल सप्ताह सुरू असतानाच नाशिकचा लाचखोर तहसिलदार नरेशकुमार तुकाराम बहिरम हा तब्बल १५ लाखाची लाच घेतांना रंगेहात सापडला आहे. त्यामुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

 

विशेष म्हणजे, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, बांधकाम मंत्री दादा भुसे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे नाशिक दौऱ्यावर होते. आणि त्याच दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात बहिरम अडकला आहे. त्यामुळे त्याची राज्यभरात चर्चा होत आहे. लाचखोर बहिरमला आज नाशिक न्यायालयात हजर केले जाणार आहे.

 

बहिरम याच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, एसीबीच्या पथकाने लाचखोर बहिरमच्या घराची झाडाझडती घेतली आहे. बहिरम हा फ्लॅट नंबर ६०४, बी विंग, मेरिडियन गोल्ड, कर्मयोगी नगर येथे राहतो. त्याचा हा फ्लॅट आलिशान आहे. याच घराची झाडाझडती घेतली असता एसीबीच्या पथकाला मोठे घबाड मिळाले आहे.

 

असे अडकले जाळ्यात

राजुर बहुला येथे एका जमिनीमध्ये मुरुम उत्खनन केले जात आहे. यामुळे नियमानुसार पाचपट दंड, स्वामित्वधन जागा भाडे मिळून एकूण रक्कम १ कोटी २५ लाख ६ हजार २२० दंडाची नोटिस तहसील कार्यालयाने जागा मालकास दिली. या आदेशाविरुद्ध जमीन मालकाने उपविभागीय अधिकारी, नाशिक यांच्याकडे अपील दाखल केले. याबाबत आदेश होऊन सदरचे प्रकरण पुनश्च फेरचौकशीसाठी नरेशकुमार बहिरम, तहसीलदार नाशिक यांच्याकडे पाठवण्यात आले. सदर मिळकती मधील उत्खनन केलेला मुरूम त्याच जागेत वापर झाल्याचे जमीन मालकाने सांगितले. याबाबत पडताळणी करणे कामी लाचखोर बहिरम याने जमीन मालकाला त्याच्या मालकीच्या राजुर बहुला येथे स्थळ निरीक्षण वेळी बोलावले. परंतु जमीन मालक वयोवृद्ध व आजारी असल्याने त्यांनी एका व्यक्तीला तेथे पाठवले. ती व्यक्ती लाचखोर बहिरम यास स्थळ निरीक्षण वेळी भेटली. त्यावेळी लाचखोर बहिरमने १५ लाख रुपयांची लाच मागितली. सदरील लाच मागणी केल्याचे पडताळणी पंचनामा वेळी मान्य करून लाच स्वीकारण्याचे मान्य केले. व मागणी केलेली लाचेची रक्कम लाच म्हणून स्वीकारली.

 

सापडले एवढे घबाड

तब्बल १५ लाखाची लाच घेतांना रंगेहात सापडलेला नाशिकचा तहसिलदार नरेशकुमार तुकाराम बहिरम याच्या घरात ४० तोळे सोने सापडले आहे. या सोन्याची बाजारातील किंमत २४ लाख ४८ हजार रुपये एवढी आहे. तसेच, त्याच्या घरामध्ये ४ लाख ८० हजार रुपयांची रोकडही सापडली आहे. प्रथमदर्शनी मिळालेले हे घबाड आहे. आता त्याचे बँक खाते, बँक लॉकर, अन्य स्थावर मालमत्ता या सर्वांचीच झडती एसीबीकडून घेतली जाणार आहे. न्यायालयाने कोठडी सुनावताच एसीबीच्या पथकाकडून आणखी आक्रमकपणे तपास केला जाणार आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles