26 C
New York
Friday, July 11, 2025

Buy now

spot_img

बीड पोलीस मुख्यालयातून 57 गॅस सिलिंडर चोरीला

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड पोलीस मुख्यालयातील गोदामाचे कुलूप तोडून 57 गॅसच्या रिकाम्या टाक्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांच्याच घरी चोरी करुन चोरट्याने पोलीसांना आवाहन दिल्यानं या घटनेची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. गुन्हा दाखल नामदेव हरीभाऊ अजबे हे पोलीस मुख्यालयात सहाय्यक फौजदार आहेत, त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की, 3 ते 4 ऑगस्ट दरम्यान पोलीस मुख्यालयातील मेन व गोदामाचे लोखंडी गेट तोडून गोदामातील गॅसच्या रिकाम्या ठेवण्यात आलेल्या 516 टाक्यांपैकी 57 टाक्या अज्ञात चोरट्याने चोरी केल्या आहेत. या टाक्यांची एकूण किंमत 1 लाख 89 हजार 229 रुपये एवढी आहे.

या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चर्चेला उधाण दरम्यान चक्क पोलीस मुख्यालयातील गॅसच्या टाक्यावरच चोरट्यानं डल्ला मारल्यानं या घटनेची चर्चा सध्या जिल्हाभर सुरू आहे. चोरांनी पोलिसांनाच आव्हान दिलं आहे. त्यामुळे सुरक्षेवर प्रश्चचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. आरोपींचा शोध सुरू असल्यची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles