20.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

बीडमधून काळ्या बाजारात मुंबईला जाणारा रेशनिंगचा तांदूळ पकडला एलसीबीची कारवाई; चौघांवर गुन्हा, दोघे अटकेत

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अहमदनगर | 

बीड येथून शासकीय रेशनिंग तांदूळ ट्रकमध्ये भरून तो मुंबई येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणार्‍या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी  नगर- जामखेड रोडवरील  बंद टोलनाक्याजवळ पकडले. त्यांच्याकडून सहा लाख 45 हजार रूपये किमतीच्या 600 तांदळाच्या गोण्या, दोन मोबाईल, 14 टायर ट्रक असा एकुण 56 लाख 65 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी चौघांविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा गोविंद ढाकणे (वय 31), विवेक रामभाऊ ढाकणे (वय 19, दोघे रा. धनगरवाडी, दोहीठाण, ता. आष्टी, जि. बीड), प्रकाशजी धनराजजी तोतला व पवन प्रकाशजी तोतला (दोघे रा. वंजारगल्ली, बीड) अशी गुन्हा दाखल  झालेल्यांची नावे आहेत. ट्रक सोबत पकडलेल्या कृष्णा ढाकणे व विवेक ढाकणे यांना अटक  करण्यात आली आहे. बीड येथील प्रकाशजी तोतला हा त्याच्या हस्तकामार्फत बीड येथुन मुंबईला एका 14 टायर ट्रकमधुन रेशनिंगचा तांदुळ  काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणार आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी उपनिरीक्षक सोपान गोरे, अंमलदार भाऊसाहेब काळे, मनोहर गोसावी, सचिन आडबल यांना कारवाई करण्याबाबत आदेश दिले.

पथकाने लागलीच नगर- जामखेड रोडने जावुन कॅन्टोन्मेंटचा बंद पडलेला टोलनाका येथे मंगळवारी (दि. 27) दुपारी सापळा लावला असता संशयीत ट्रक येताच पोलिसांनी थांबवली. ट्रकमध्ये कृष्णा गोविंद ढाकणे व विवेक रामभाऊ ढाकणे मिळून आली. ट्रकची पंचासमक्ष पहाणी केली असता त्यामध्ये तांदळाच्या गोण्या भरलेल्या दिसल्या. तांदळाच्या गोण्याबाबत विचारपुस करता त्यांनी सदर माल हा प्रकाशजी धनराजजी तोतला व पवन प्रकाशजी तोतला यांच्या मालकीचा असुन बीड एमआयडीसी  येथील महेश गृहउद्योग येथील पत्र्याचे शेडमधुन शासकीय स्वस्त धान्य वितरण योजनेतील 50 किलो वजनाच्या 600 गोण्या तांदुळ दुसर्‍या इतर गोण्यामध्ये पलटी मारून विना परवाना बेकायदेशिररित्या जवळ बाळगुन काळ्या बाजारात मुंबई  येथे विक्री करीता घेवुन जात असल्याची कबुली दिल्याने दोघांना मुद्देमालासह ताब्यात घेतले.

सदरची कारवाई अधीक्षक ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकाडे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles