22.9 C
New York
Friday, July 11, 2025

Buy now

spot_img

मुख्यमंत्र्यांचे विठुरायाला साकडे,”बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे”

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

पंढरपूर |

बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना चांगले दिवस येऊ देत. पाऊस चांगला पडू दे. राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, असे मागणे शासकीय महापूजेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठुरायाकडे मागितले. तसेच जनसेवेचा जो वसा माझ्या हाती पांडुरंगाने सोपवला आहे तो असाच पुढे नेण्याचे बळ मला मिळावे एवढीच इच्छा मनोमन त्याच्याकडे व्यक्त केली. असेही त्यांनी सांगितले, आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज विठ्ठल-रुख्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली.

 

तसेच महापूजेनंतर आयोजित सत्कार सोहळ्यामधये मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरच्या विकास आराखड्यासह इतर अनेक मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण भाष्य केले. दरम्यान, सोहळ्यातून संबोधित करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यात नुकतीच पावसाला सुरुवात झाली असून यंदाचे पर्जन्यमान समाधानकारक ठरावे आणि राज्यातील बळीराजा सुखी समाधानी व्हावा हे आणि एवढेच मागणे मी विठुरायाच्या चरणी मागितले. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरामध्ये मंगलमय वातावरण झालेलं आहे. ‘असे ते यावेळी म्हणाले.

शिंदे यांनी पंढरपूर नगरपरिषदेच्या विकास कामावर भाष्य केलं ते म्हणाले,’ पंढरपूर नगरपरिषदेकडील कामांसाठी नगरोत्थानमधून १०८ कोटी आणि शहरातील पाणीपुरवठा योजनेसाठी १०९ कोटी रुपयाच्या कामाला मान्यता देण्यात आली आहे. याबरोबरच आणि मंदिर आराखड्यासाठी ७३ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. पंढरपूर शहर विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊन तयार करण्यात येईल. तसेच, ३० खाटांचे रूपांतर १०० खाटांमध्ये लवकरच करण्यात येईल’

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles