24.1 C
New York
Friday, July 18, 2025

Buy now

spot_img

‘बकरी ईद’ची सार्वजनिक सुट्टी 28 ऐवजी 29 जूनलाच! शासनाची अधिसुचना जाहीर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई |

शासनाकडून सन २०२३ या वर्षाकरिता जाहीर करण्यात आलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांमधील ‘बकरी ईद’ची सार्वजनिक सुट्टी २८ जून ऐवजी २९ जून रोजी जाहीर करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं याची घोषणा केली आहे.

शासनाकडून सन २०२३ या वर्षाकरिता जाहीर करण्यात आलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांमधील ‘बकरी ईद’ची सार्वजनिक सुट्टी बुधवार, २८ जून २०२३ रोजी दर्शविण्यात आली होती. मात्र, हा सण गुरुवार, २९ जून २०२३ रोजी येत असल्यानं २८ जूनची सुट्टी रद्द करुन २९ जून रोजी जाहीर करण्यात आली आहे, अशी अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सो. ना. बागुल यांनी काढली आहे.

दरम्यान, २९ तारखेलाच आषाढी एकादशी आणि बकरी ईद दोन्ही सण आले आहेत. त्यामुळं दोन्ही सार्वजनिक सुट्ट्या एकाच दिवशी आल्यानं त्या ओव्हरलॅप झाल्या आहेत. पण शासनानं यापूर्वी २८ जून रोजी बकरी ईद आणि आषाढी एकादशी २९ तारखेला अशा सलग दोन सुट्ट्या जाहीर झाल्या होत्या. पण आता शासनानं यात बदल केल्यानं या दोन्ही सुट्ट्याच एकाच दिवशी आल्यानं एकच सार्वजनिक सुट्टी मिळणार आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles