27.5 C
New York
Saturday, August 23, 2025

Buy now

spot_img

कामानिमित्त शेतात गेलेल्या पती-पत्नीचा वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेह आढळ्याने खळबळ

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

आष्टी |

कामासाठी शेतात गेलेल्या पती-पत्नीचा वेगवेगळ्या ठिकाणी गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.ही घटना मंगळवारी सायंकाळी वाघळूज येथे उघडकीस आली. ईश्वर गुंड ( ३४) आणि ऋतुजा गुंड ( २६) असे मृत पती-पत्नीची नावे आहेत.

 

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील वाघळूज येथील ईश्वर गुंड हे पत्नी श्रतुजा यांच्यासह मंगळवारी सकाळी शेतात कामासाठी गेले होते. सायंकाळी दोघेही घरी परतले नाहीत. यामुळे नातेवाईकांनी गावात शोध घेतल्यानंतर रात्री शेतात शोधाशोध केली. यावेळी प्रथम ईश्वर गुंड याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. तर श्रतुजाचा शोध लागला नाही. दरम्यान, आज सकाळी शेतातच श्रतुजाचा देखील मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

 

या हृदयद्रावक घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. पतीचा आणि पत्नीचा मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आल्याने ही आत्महत्या की घातपात अशी चर्चा सुरु झाली आहे. अंभोरा पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून अधिक तपास सुरु आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles