18.3 C
New York
Monday, October 7, 2024

Buy now

spot_img

बीडचे पालकमंत्री शोधा आणि रोख ५१ रुपये मिळवा, शेतकरी आक्रमक, स्वाभिमानी शेतकरी कडून बक्षीस जाहीर

- Advertisement -

अवकाळी  पावसामुळे पिकांचे नुकसान; पंचनामे करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मागणी

बीड |
बीड जिल्ह्यासह गेवराई तालुक्यातील ग्रामीण भागात दि. 28 एप्रिल 2023 रोजी, सलग दोन दिवस अवकाळी जोरदार पाऊस झाला.. वारा, पाऊस, विजांचा कडकडाट सुरू आहे. शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण व वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसाने गेवराई तालुक्यातील गोदाकाठ व उजवा कालव्या जवळच्या शेत परिसरात फळबांगाचे मोठे नुकसान झाले असून वाऱ्याने अंबा, पपई, मोसंबीचा सडा पडला आहे. लोकप्रतिनिधी बाजार समितीच्या निवडणुकीत दंग झाले आहे तर विद्यमान पालकमंत्री अतुल सावे बीड जिल्हा सोडून झोपले आहे. शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना वार्यावर सोडले आहे. तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती आघाडी प्रदेशाध्यक्षा पुजाताई मोरे यांनी बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची तातडीने मदत द्यावी अशी मागणी केली. त्याचबरोबर बीडचे पालकमंत्री शोधा आणि रोख ५१ रुपये मिळवा, अश्या टॅग लाईन खाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कडून बक्षीस जाहीर करण्यात आले.
गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग, कोळगाव, तांदळा, जव्हारवाडी, सावरगाव बंगाली पिंपळा, मादळमोही, आदी ठिकठिकाणी दि.२७ व २८ एप्रिल २०२३ रोजी बैमोसमी जोरदार पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. मोठ्या प्रमाणावर शेतपिकांचे, फळबागा भाजीपाला आंबा मोसंबी बागांना मोठ्या प्रमाणावर फटका बसून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तरी शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आधार देऊन हेक्टरी पन्नास हजार रुपयांची तातडीने मदत द्यावी अशी मागणी शेतकरी नेत्या पुजाताई मोरे यांनी केली.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles