34.1 C
New York
Tuesday, June 24, 2025

Buy now

spot_img

बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागरांकडून काकांना धोबीपछाड; 18 पैकी 15 जागेवर दणदणीत विजय

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

बीडमध्ये बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार संदीप क्षीरसागर यांनी काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा दणदणीत पराभव केला आहे. निवडणूकीत 18 पैकी 15 जागेवर आमदार संदीप क्षिरसागर पुरस्कृत उमेदवार विजयी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिता अशी की, बीड (Beed) कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल हाती आला. ज्यामध्ये आमदार संदीप क्षीरसागरांनी (Sandeep Kshirsagar) काका जयदत्त क्षीरसागरांच्या चाळीस वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावला आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांनी 5 पक्षांची मोट बांधून काका विरोधात कडवे आव्हान दिले होते. हाती आलेल्या निकालानुसार 18 पैकी 15 जागेवर दणदणीत विजय मिळवत बीड बाजार समितीवर सर्वपक्षीय आघाडीचा झेंडा फडकवला आहे.

या निकालाने काकाने पुतण्याला धोबीपछाड केल्याचे बोलले जात असून हा जयदत्त क्षीरसागर यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. मागील 35 वर्षांपासून बीड कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची एक हाती सत्ता होती.

दरम्यान, या विजयानंतर संदीप यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष करत गुलालाची उधळण केली आहे. ही निवडणुक मात्र प्रतिष्ठेची बनवून आमदार संदीप क्षीरसागर यांनी शिंदे गट, ठाकरे गट, भाजपा, शिवसंग्राम आणि राष्ट्रवादी पक्षाची मोट बांधून निवडणुकीला सामोरे गेले होते.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles