24.1 C
New York
Saturday, July 19, 2025

Buy now

spot_img

अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा -आमदार सुरेश  धस

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

आमदार सुरेश  धस यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी

 

आष्टी |

शनिवार दि. १५ एप्रिल रोजी सायंकाळी अचानक आलेल्या अवकाळी पाऊस हा गारपिटीसह झाल्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठ्या नुकसान नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.आष्टी तालुक्यातील अरणविहिरा, पिंपळगाव घाट, देऊळगाव घाट,मराठवाडी या परिसरामध्ये जनावरांना चारा असलेला मका आणि कडवळ या पिकांसह अनेक ठिकाणी डाळिंबाच्या बागांवर या अवकाळीच्या गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. अरणविहीरा येथे दोन फूट उंचीच्या गारांचा थर झालेला आढळून आला आहे.शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा या पिकासाठी बियाणे म्हणून राखून ठेवलेला कांदा देखील या गारपीटीमध्ये नुकसानग्रस्त झालेला आहे. या संपूर्ण परिसरातील गावांमधील या गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत याबाबत आमदार सुरेश  धस  यांनी जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ मुंडे यांचेकडे मागणी करून सर्व संबंधित तहसीलदारांना पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी केली आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles