Home महाराष्ट्र अवकाळी पावसामुळे शेतीचं जे नुकसान झाले त्याचे पंचनामे युद्धपातळीवर करा – मुख्यमंत्री...

अवकाळी पावसामुळे शेतीचं जे नुकसान झाले त्याचे पंचनामे युद्धपातळीवर करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

राज्यात अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. यावरुन विरोधकांनी आरोप करायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अवकाळी पावसामुळे शेतीचं जे नुकसान झालं आहे, त्याचे पंचनामे युद्धपातळीवर करा, असे आदेश मी अयोध्येतूनच दिले आहेत.

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. अवकाळी पावसामुळे शेतीचं जे नुकसान झालं आहे, त्याचे पंचनामे युद्धपातळीवर करा. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version