नव्या फ्रेमवर्कनुसार सेमिस्टर पद्धतीने बारावी बोर्ड परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्यात येतील. त्याचबरोबर कला, वाणिज्य, विज्ञान या अभ्यासक्रमात शिकवल्या जाणार्‍या विषयांची परीक्षा विद्यार्थ्यांना देण्याची मर्यादा नसेल. विद्यार्थ्याला बारावी बोर्ड परीक्षा देताना 16 विविध अभ्यासक्रमांचे कोर्स उपलब्ध होतील आणि त्यातून विद्यार्थी आपल्या आवडीचे अभ्यासक्रम निवडून बोर्ड परीक्षेला सामोरे जातील. यासाठी अकरावी आणि बारावी अभ्यासक्रमाच्या रचनेबरोबर पाठ्यपुस्तकांमध्ये बदल केला जाईल, असे देखील तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

बारावीची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्यासंदर्भात राज्य शासनाचे कोणतेही धोरण ठरलेले नाही. परीक्षा घेण्यासंदर्भात राज्य शासन अगोदर धोरण ठरवेल आणि राज्य शासनाने एकदा धोरण निश्चित केले की त्याची अंमलबजावणी राज्य मंडळ करणार आहे.
– शरद गोसावी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ