13.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

तीन हजाराची लाच घेताना तलाठी पकडला

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

गेवराई |

खरेदी केलेल्या प्लॉटची फेरफार ऑनलाईन नोंद करण्यासाठी 3,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गेवराई तालुक्यातील तलाठ्याला  रंगेहाथ पकडले आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या प्लॉटची फेरफार ऑनलाईन नोंद करण्यासाठी  तलाठी यांनी 3,000 रू. लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी संबंधित फिर्यादीने एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. एसीबीने खात्री केल्यानंतर आज दुपारी तलाठी अमित नाना तरवरे, वय 32 वर्ष, नोकरी,तलाठी दैठण सज्जा, अतिरिक्त कार्यभार तलवडा सज्जा, ता. गेवराई, (वर्ग 3) रा.नाईकनगर, गेवराई, ता. गेवराई याला पंचसमक्ष लाच घेताना अखेर एसीबीने बेड्या ठोकल्या आहेत.

 

सदर कारवाई  संदीप आटोळे पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली .श्री.शंकर शिंदे,पोलिस उप अधिक्षक, ला.प्र.वि,बीड,  सापळा अधिकारी: – श्री.अमोल धस,पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार भारत गारदे,  अविनाश गवळी ला.प्र.वि, बीड आदींनी केली.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles