19 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

बांधकाम ठेकेदारांचे १५,००० कोटी थकले, १ एप्रिलपासून काम बंद ठेवण्याचा इशारा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई |

राज्य सरकारच्या अखत्यारीतील विविध खात्यांची पंधरा हजार कोटींची बांधकामे केलेल्या दीड लाख ठेकेदारांना मार्चअखेर बिले मिळतील, अशी अपेक्षा होती; परंतु शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बिले लांबणीवर पडली आहेत. मार्चअखेर बिले न मिळाल्यास १ एप्रिलपासून काम बंद ठेवण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने दिला आहे.

सद्य:स्थितीत ११,२०० कोटींची बिले सादर झालेली असून, ती प्रलंबित आहेत, तर ४,००० कोटींची बिले सादर करण्यास उशीर झाला आहे. एकंदरीत १५,००० कोटींची बिले मार्चअखेरपर्यंत अदा होणे बाकी आहेत, असे कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी सांगितले.

११,२०० कोटींची बिले
सा. बां. विभाग ३,५५० कोटी
ग्रामविकास विभाग १,५५० कोटी
मृद व जलसंधारण ३,४०० कोटी
जलसंपदा २,७०० कोटी

जिल्हानिहाय थकीत बिले (कोटीत)
नागपूर ४७५, मुंबई ५५०, पुणे ४७५, नाशिक ३७५, छत्रपती संभाजीनगर ३५०, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग २७५, सोलापूर २४५, अहमदनगर २००, धुळे, जळगाव २३५, धाराशिव, जालना २८०, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ ३२०, कोल्हापूर ३००, सांगली २०५, सातारा २२०, अमरावती विभाग २३०, गडचिरोली, गोंदिया ३१०, चंद्रपूर १५५.

निम्मी कामे महापालिकेची
मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, डोंबिवली आणि आदी दहा महापालिकांमध्ये केलेल्या कामाची ६,००० कोटींची बिले थकित आहेत.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles