3.6 C
New York
Monday, January 13, 2025

Buy now

spot_img

प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं; पत्नीनं घेतला अपमानाचा बदला!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

गाझियाबाद |

पती त्याच्या पत्नीसह आरामात बेडवर झोपला होता. पण त्याला कल्पना नव्हती की आजची रात्री त्याच्या आयुष्यातील शेवटची रात्र असेल. बेडवर एकत्र झोपलेल्या पत्नीने तिच्या प्रियकराला फोन लावला.तू लवकर ये, आज याच्यापासून कायमची सुटका होईल असं सांगताच थोड्याच वेळात खोलीत गोळीबाराचा आवाज घुमतो. गाझियाबादमधील या भयंकर घटनेची कहानी पत्नीनं लिहिली होती जिला थप्पडचा बदला मृत्यूनं घ्यायचा होता.

नंदग्राम परिसरात शिवानी नावाच्या महिलेने पोलिसांना फोन करून पतीने आत्महत्या केल्याचे सांगितले. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. कपिल चौधरीचा मृतदेह तिथेच पडला होता, जवळच एक पिस्तूल ठेवले होते. कपिलच्या डोक्याच्या डाव्या बाजूला गोळी लागली. पोलिसांनी तपास सुरू केला, गोळी खूप जवळून सोडण्यात आल्याचे स्पष्ट झाले. मग त्या रात्री कपिलने खरच आत्महत्या केली होती का? कपिलची पत्नी शिवानी जोरजोरात रडत होती. पतीच्या निधनाने शोक करीत होती.

पतीची हत्या करून आत्महत्येचा बनाव
पोलीस तपास जसा पुढे गेला तसा कपिल हा राइट हँडर होता मग त्याने डाव्या हाताने हाताने पिस्तूल कसे धरले आणि डोक्याच्या डाव्या बाजूने गोळी झाडली हा प्रश्न उभा राहिला. या प्रकारामुळे पोलिसांना संशय येऊ लागला आणि संशयाची सुई थेट शिवानीकडे गेली. पोलिसांनी शिवानीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. तिचे कॉल डिटेल्स काढले असता धक्कादायक खुलासे झाले.

दारूच्या नशेत बुडवून पतीला संपवलं
शिवानी अंकुश नावाच्या मुलाशी रोज तासनतास बोलायची. कपिल चौधरीचा पोस्टमॉर्टम रिपोर्टही समोर आला असून त्याला गोळी झाडण्यापूर्वी ड्रग्ज देण्यात आल्याचे समोर आले आहे. हत्या झाली तेव्हा कपिल दारूच्या नशेत होता. त्याच्यासोबत काय घडतंय हे त्याला कळत नव्हतं. पोलिसांनी शिवानी आणि अंकुशला अटक केली.

प्रियकरासह मिळून पतीची हत्या
अंकुश जवळच मोबाईल शॉपी चालवायचा. पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी करून संपूर्ण घटना सांगितली. त्या रात्री शिवानीने पतीला अंमली पदार्थ मिसळून जेवण दिले आणि नंतर दोघेही झोपी गेले. कपिल जेव्हा गाढ झोपेत गेला तेव्हा तिने आपल्या प्रियकराला घरी बोलावले आणि पतीला गोळ्या घालण्यास सांगितले, मग शिवानीच्या सांगण्यावरून अंकुशने तेच केले. नंतर खून हा आत्महत्येचा भास व्हावा यासाठी दोघांनी बंदूक तिथेच ठेवली.

थप्पडचा बदला खूनाने घेतला
शिवानी जेलमध्ये एकामागून एक किस्से सांगत होती. शिवानीने सांगितले की, कपिल तिला खूप मारायचा. त्याच्याकडून तिला रोज मारहाण व्हायची आणि त्यानंतरच तिचे अंकुशसोबत संबंध सुरू झाले. ती कपिलचा तिरस्कार करू लागली म्हणून त्याला संपवण्याचा कट रचला. शिवानीनं प्लॅनिंगनुसार कपिलची आत्महत्या भासावी यासाठी प्लॅन केला. मात्र पोलिसांनी तपासात हे सर्व बाहेर काढले त्यामुळे शिवानी आणि अंकुश दोघेही आज तुरुंगात आहेत.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles