आष्टी |
आष्टी शहरातील संभाजीनगर भागातून भेसळयुक्त दुध तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या मोठा साठा पोलिसांनी धाड टाकून हस्तगत करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली. याप्रकरणी गुरूवारी दोघाजणांवर आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भेसळीसाठी लागणारे साहित्य, दोन वाहने असा एकूण ८ लाख ९१ हजार ३७५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त दुधाचे संकलन होत असल्याची चर्चा आहे. याचे गांभीर्य ओळखून आष्टी पोलिसांनी बुधवारी रात्री आष्टी शहरातील संभाजीनगर येथे एका ठिकाणी धाड टाकली. यावेळी भेसळयुक्त दुध बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या १३२ गोण्या, २२० तेलाचे डब्बे आढळून आले. पोलिसांनी सर्व साहित्य आणि दोन वाहने असा एकूण ८ लाख ९१ हजार ३७५ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त सय्यद इम्रान हश्मी यांच्या फिर्यादीवरून नंदु भागवत मेमाणे, जंगदबा मिल्क अॅन्ड प्राॅडकटचे मालक सतिश नागनाथ शिंदे यांच्यावर आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नंदु मेमाणे याला ताब्यात घेतले आहे. यामागे मोठे रॅकेट असल्याची शक्यता आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय देशमुख, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद काळे, पोलिस उपनिरीक्षक नामदेव धनवडे, दत्तात्रय टकले, स्वाती मुंडे, सचिन कोळेकर, प्रवीण क्षीरसागर, अमोल ढवळे बब्रुवान वाणी,भरत गुजर ,शिवप्रकाश तवले,आकाश आडागळे, सचिन पवळ, रियाज पठाण, जिजा आरेकर ,अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त सय्यद इम्रान हश्मी, नमुना साहाय्यक शेख मुक्तार यांनी केली.
———–