-6.8 C
New York
Tuesday, February 3, 2026

Buy now

spot_img

२५ हजारांची लाच स्वीकारताना अंबाजोगाईचा सहकार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अंबाजोगाई |

 

येथील सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी संतोष भंडारी यास २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने सोमवारी दुपारी रंगेहात पकडले.

 

एका पतसंस्थेविरुद्धच्या तक्रारी निकाली काढण्यासाठी भंडारी याने संबंधित संस्थेच्या सचिवाकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी पहिला हप्ता स्वीकारताना ही मोठी कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित पतसंस्थेच्या विरोधात असलेल्या तक्रारींचे निवारण करण्याच्या बदल्यात भंडारी यांनी लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी पतसंस्थेच्या सचिवांनी जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सोमवारी दुपारी अंबाजोगाई येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात सापळा रचला. लाचेच्या एकूण ५० हजार रुपयांपैकी २५ हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले होते. ही रक्कम स्वीकारताना पथकाने भंडारी यांना रंगेहात ताब्यात घेतले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून संतोष भंडारी याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून या प्रकरणातील अधिक तपशील तपासानंतर समोर येईल असे पथकाकडून सांगण्यात आले आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles