-12 C
New York
Friday, January 30, 2026

Buy now

spot_img

परळीतील लॉजवर पोलिसांचा छापा; आंतरजिल्हा वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

दोन पीडित महिलांची सुटका; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

परळी  |

परळी-बीड रोडवरील टोकवाडी येथील ‘साई लॉज’वर परळी ग्रामीण पोलीस आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (AHTU) यांनी गुरुवारी (दि. २९) संयुक्त कारवाई करत मोठ्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, तिघांविरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​अनैतिक वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव व परळी ग्रामीणचे सहायक पोलीस निरीक्षक सदानंद मेंडके यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, साई लॉजवर बाहेर जिल्ह्यांतून महिलांना बोलावून वेश्याव्यवसाय करून घेतला जात आहे. ही माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मझहरअली सय्यद यांच्यासह एएचटीयू टीमने सापळा रचला.

​पोलिसांनी एक डमी ग्राहक लॉजवर पाठवला. तेथील एजंटने वेश्यागमनासाठी १५०० रुपयांची मागणी केली. डमी ग्राहकाने पैसे देऊन इशारा करताच, दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने लॉजवर धाड टाकली.

​छाप्यादरम्यान पोलिसांनी नाशर नशीर शेख याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, डमी ग्राहकाने दिलेल्या ५०० रुपयांच्या तीन नोटा त्याच्याकडे मिळून आल्या. घटनास्थळावरून ६ न वापरलेले निरोधही जप्त करण्यात आले आहेत. तपासात असे समोर आले की, एजंट नाशर नशीर शेख, मॅनेजर सोमनाथ ज्ञानोबा मुंडे (रा. टोकवाडी) आणि दत्ता अंतराम मुंडे (रा. कन्हेरवाडी) हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना बोलावून हा व्यवसाय चालवत होते.

​सुटका करण्यात आलेल्या दोन महिलांपैकी एक भिवंडी (ठाणे) आणि दुसरी पुणे येथील आहे. आरोपी त्यांना फोन करून बोलावून घेत असत. ग्राहकांकडून घेतलेल्या १५०० रुपयांपैकी केवळ ५०० रुपये या महिलांना दिले जात होते, तर उर्वरित रक्कम आरोपी स्वतः लाटत असत.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ च्या कलम ३, ४, ५ आणि ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

​ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, चेतना तिडके, सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात पोलीस निरीक्षक मझहरअली सय्यद, सदानंद मेंडके, पल्लवी जाधव, अंकुश निमोने, उषा चौरे, अशोक शिंदे, राजेंद्र मिसाळ, नवनाथ हारगावकर, रमेश तोटेवाड, तुळशीराम परतवाड, रावसाहेब मुंडे, विठ्ठल परजणे, योगेश निर्धार आणि महादेव केदार यांचा समावेश होता.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles