5 C
New York
Monday, December 29, 2025

Buy now

spot_img

शेत जमिनीची मोजणी फाईल निकाली काढण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेतांना केज भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक जाळ्यात

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

 

शेत जमिनीची मोजणी फाईल निकाली काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून ३०,०००/- रुपये लाचेची मागणी करून, त्यातील १०,०००/- रुपयांची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालय, केज येथील एका लिपिकाला रंगेहात पकडले आहे.

ही कारवाई छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रांतर्गत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना व बीड यांनी यशस्वी केली.

उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, केज, जि. बीड येथील लिपिक माणिक अण्णासाहेब वाघमारे (वय ५० वर्ष) याने तक्रारदार शेतकरी त्यांच्या जमिनीच्या हद्द कायम मोजणीसाठी भूमी अभिलेख कार्यालय, केज येथे अर्ज केला होता. आरोपी लोकसेवक माणिक वाघमारे याने दि. १८.१२.२०२५ रोजी मोजणी केली होती. या मोजणीनुसार क्षेत्राची घट न दाखवता फाईल निकाली काढण्याच्या मोबदल्यात आरोपीने तक्रारदाराकडे ३०,०००/- रुपये लाचेची मागणी केली.

तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार सोमवारी दि. २९.१२.२०२५ रोजी पडताळणी करण्यात आली. पडताळणी दरम्यान आरोपीने ३०,०००/- रुपयांच्या मागणीची पुष्टी केली. त्यापैकी ५,०००/- रुपये त्याने यापूर्वीच स्वीकारल्याचे मान्य केले. उर्वरित २५,०००/- रुपयांपैकी १०,०००/- रुपये आज स्वीकारताना आरोपीला तहसील कार्यालयासमोर, केज-बीड रोडवरील एका चहाच्या टपरीसमोर सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.

या वेळी आरोपीच्या अंगझडतीमध्ये लाचेची रक्कम १०,०००/- रुपये, इतर रोख ५,५००/- रुपये, विवो मोबाईल व दोन अंगठ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.

दरम्यान आरोपीच्या धाराशिव येथील निवासस्थानाची घरझडती घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी पोलीस स्टेशन केज येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर श्रीमती माधुरी कांगणे, आणि अपर पोलीस अधीक्षक शशिकांत शिनगारे, यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे (जालना), पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपअधीक्षक बाळु जाधवर (जालना), तपास अधिकारी पोलीस निरीक्षक, समाधान कवडे (बीड), पो.ह. गजानन घायवट, पो.ना. गजानन खरात, पो.अं. गजानन कांबळे, चालक विठ्ठल कापसे आदीच्या पथकाने केली.

 

कोणत्याही शासकीय कामासाठी कोणीही लोकसेवक लाचेची मागणी करत असल्यास, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल-फ्री क्रमांक १०६४ वर त्वरित संपर्क साधावा असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या वतीने करण्यात आले आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles