2.7 C
New York
Tuesday, December 23, 2025

Buy now

spot_img

संतोष देशमुख हत्या प्रकरणी अखेर आरोपींवर दोष निश्चित; पुढील सुनावणी ८ जानेवारीला होणार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

 

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आज बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. न्यायाधीशांनी संतोष देशमुखांच्या हत्येचा घटनाक्रम वाचून दाखवला.यावेळी वाल्मिक कराड पहिल्यांदाच न्यायालयासमोर स्वत:हून आरोप मान्य नसल्याचं बोलला. आता सदर प्रकरणी 8 जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये न्यायाधीशांनी सर्व आरोपींना असलेल्या गुन्ह्याबाबत माहिती दिली. यादरम्यान न्यायधीशांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह अन्य आरोपींना एक प्रश्न विचारला. यावेळी न्यायालयात नेमकं काय घडलं, याची माहिती समोर आली आहे.

 

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात 23 वी सुनावणी झाली. मागील सुनावणीत आरोपी विष्णू चाटेच्या जामीन अर्जावर युक्तिवाद झाला होता. तसेच संतोष देशमुखांच्या हत्येचे व्हिडीओ आरोपींच्या वकिलांना दिल्यानंतर सर्व आरोपींवर आज आरोप निश्चित करण्यात आले.

 

सरपंच संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणीच्या सुनावणीत न्यायाधीशांनी सर्व आरोपींना असलेल्या गुन्ह्याबाबत माहिती दिली. संपूर्ण घटनाक्रम आरोपीला वाचून दाखवत हे तुम्हाला मान्य आहे का?, असा सवाल विचारला. न्यायाधिशांच्या या प्रश्नावर वाल्मिक कराडसह सर्व आरोपींनी आरोप मान्य नसल्याचे म्हटले. यावेळी वाल्मिक कराड पहिल्यांदाच न्यायालयासमोर स्वत:हून आरोप मान्य नसल्याचं बोलला. आता सदर प्रकरणी 8 जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

 

सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितलं की, आज आरोप निश्चित केले आहेत. खंडणी मिळण्यास अडथळा केला म्हणून संतोष देशमुख यांचा खून केला. पुढील सुनावणी ८ जानेवारी रोजी होईल. आजही आरोपी वकिलांनी या खटल्यात डी फॉर डीले आणि डी फोर डीरेल केले गेले. खटल्यात विलंब लावणे व खटला उलटवून टाकण्याचा प्रयत्न असे आरोप आहेत.

 

प्रत्यक्ष पुराव्याचे काम लवकरच सुरू होईल. तीच ती कारणे न्यायालयात मांडली जात होती त्यामुळे न्यायालयाने आदेश करावा अशी विनंती केली. आरोप निश्चित करण्यात किती वेळ लागला हे पाहिले. खटला लवकरात लवकर चालवण्याचा प्रयत्न केला जात आहे असंही उज्ज्वल निकम यांनी सांगितलं.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles