बीड |
अजितदादांच्या या वायद्यावर विश्वास दाखवत बीडच्या जनतेने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रेमलता पारवे यांना नगराध्यक्षपदी निवडून देत क्षीरसागरांच्या घराणेशाहीला सुरूंग लावला.नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या ज्योती घुमरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या स्मिता वाघमारे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रेमलता पारवे यांच्यात तिरंगी लढत होती. यात प्रेमलता पारवे यांनी बाजी मारत मात्तबरांना धक्का दिला
गेवराईचे पार्सल आम्ही तिकडेच पाठवू, असा दावा योगेश क्षीरसागर यांनी केला होता. पण प्रत्यक्षात बीडमधील संदीप आणि योगेश क्षीरसागर या दोन भावाचे पार्सल अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीनेच पॅक केल्याचे स्पष्ट झाल आहे. सर्वाधिक जागा आणि नगराध्यक्षपद पटकावत अजित पवारांनी बीडच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणला आहे. नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या ज्योती घुमरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या स्मिता वाघमारे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रेमलता पारवे यांच्यात तिरंगी लढत होती. यात प्रेमलता पारवे यांनी बाजी मारत मात्तबरांना धक्का दिला.त्यांचा हा आत्मविश्वासच त्यांना नडल्याचे आता दिसून आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर हे पुन्हा बाजी मारतील असे चित्र होते पण प्रत्यक्षात तसे घडताना दिसत नाही. दुसरीकडे त्यांचे चुलत बंधू योगेश क्षीरसगार यांनी ऐनवेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला, पण ही पलटी मारणे त्यांच्याच अंगलट आली. अजित पवारांनी प्रचारात संदीप क्षीरसागर, योगेश क्षीरसागर आणि एकूणच सगळ्या कुटुंबाला टारगेट केले होते. ही मक्तेदारी आणि घराणेशाही मोडून काढण्याचे आवाहन अजित पवारांनी केले होते. बीडकरांनी त्याला प्रतिसाद देत मंत्री पंकजा मुंडे यांनाही धक्का दिला आहे.
जिल्ह्यातील सहा नगरपालिकांचे नगराध्यक्ष व या नगरपालिकांतील 182 नगरसेवकांसाठी निवडणुका झाल्या. सर्वाधिक रंगतदार झालेल्या बीड नगरपालिकेच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट आणि त्यातून भाजपला सर्व जागा लढता आल्या या वेगळेपणात या दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून शेवटपर्यंत एकमेकांवर चिखलफेक सुरु होती. आमदार विजयसिंह पंडितांवर त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आपला सरळ मार्ग निवडत निवडणुक लढविली खरी पण त्यांचाही मार्ग यावेळी चुकलाच. दोन भावांच्या भांडणात बीडच्या मतदारांनी त्यांचे पार्सल पॅक करत नवा पर्याय निवडल्याचे निकालवून स्पष्ट झाले आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठ्या बीड नगरपालिकेवर मागच्या 30 वर्षांपासून क्षीरसागरांचे वर्चस्व होते. यावेळी 50 वरुन 52 नगरसेवक झालेली निवडणुक रंगतदार झाली.
इतिहासात प्रथमच भाजपला सर्व जागा लढता आल्या. कारण, योगेश क्षीरसागर यांनी ऐनवेळी भाजपचा तंबू गाठला. बीडचे पालकमंत्री असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे लक्ष या निवडणुकीवर होते. पण, ऐनवेळी फूट पडल्यामुळे आमदार विजयसिंह पंडित यांना त्यांचे होमपिच गेवराई सांभाळतानाच बीडची धुराही सांभाळावी लागली. पण या दुहेरी भूमिकेत बीडमध्ये त्यांना यश मिळाले असले तरी होम पिचवर मात्र मात खावी लागली आहे.
योगेश क्षीरसागर ऐनवेळी गळाला लागल्याने भाजपला बीडमध्ये प्रथमच सर्व जागा लढविता आल्याने मंत्री पंकजा मुंडे यांचा हुरुप वाढला होता. पण, निवडणुकीच्या स्थानिक प्रचारात पंडीत – डॉ. क्षीरसागर यांच्यातील वाक् युद्ध शेवटपर्यंत रंगले. पंडितांकडून डॉ. क्षीरसागरांना ‘बालक’ तर डॉ. क्षीरसागरांकडून पंडितांना ‘गेवराईचे पार्सल’ असे टोमणे मारण्यात आले होते. बीडमध्ये खुद्द अजित पवारांनी दोन सभा घेतल्या. तर, पंकजा मुंडे यांनीही बीडमध्ये दोन दिवस तळ ठोकला होता.
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनीही भाजपसाठी ताकद पणाला लावली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही बीडमध्ये सभा झाली. पण बीडकरांच्या मनात यावेळी वेगळेच होते हे निकालावरून स्पष्ट झाले आहे. इकडे महायुतीतील दोन मित्रपक्ष ताकद लावून एकमेकांविरुद्ध लढत असताना विरोधी पक्षातील आमदार संदीप क्षीरसागर शांतपणे एकहाती निवडणूक लढवत होते. ते दोन्ही सत्ताधारी पक्षांना धक्का देत चमत्कार घडवतील असे बोलले जात होते. सगळी निवडणूक आणि प्रचार यंत्रणा त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती.


