7.8 C
New York
Saturday, November 15, 2025

Buy now

spot_img

अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या बापाला ७ वर्ष कारावासाची शिक्षा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

 

बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराने लैंगिक छळ व मारहाण केलेल्या प्रकरणी शिरूर तालुक्यातील रहिवासी असलेल्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश – १ मा.एस.एस. घोरपडे साहेब यांनी दोषी ठरवून ७ वर्ष सक्षम कारावास व १०,०००/- रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने सक्षम कारावास एवढी शिक्षा ठोठावली आहे.

 

या प्रकरणाची चौकशी दरम्यान हकीकत अशी की, दि. १६/०८/२०२४ रोजी रात्री ०८.०० वाजता पिडीता जेवण करून घरी बसले असताना आरोपी हा दारू पिऊन घरी आला व किरकोळ विनाकारण मारहाण करु लागला यामुळे पिडीता ही शेजा-यांकडे झोपायला गेली. काही वेळानी आरोपी यांनी पिडीतास गोड बोलून घरी झोपायला नेली व पिडीता ही झोपली असता तिला विनाकारण त्याच्या कडे ओढू लागला तसे पिडीताने त्यास बाजूला सरकवण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने पिडीतास लाथाबुक्क्याने मारहाण करून तिची जबरदस्तीने पँट काढली. पिडीताने आरोपीस बाजूला लोटून दिले व घराच्या बाहेर पळून गेली.

 

दि. १७/०८/२०२४ रोजी संध्याकाळी आरोपी पिडीतास म्हणाला की “तु रात्री झोपताना माझ्या सोबत झोप” जेव्हा पिडीताने आरोपीस नकार दिल तेंव्हा. आरोपीने पुन्हा पिडीतास मारहाण केली. यामुळं पिडीता ही पुन्हा शेजा–यांकडे पळून गेली. दुस–या दिवशी दि १८/०८/२०२४ रोजी आरोपी हा शेजा—यांना “ माझ्या मुलीला रात्री घरी मुक्काम का करु दिला असे म्हणून शिवीगाळ केली”

 

पिडीतच्या फिर्यादीवरून पोलिस स्टेशन शिरूर कासार येथे आरोपी विरुद्ध कलम ७४,७५,७६,११५,३५२ भा.न्या. सं. आणि कलम ८,१०,१२ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा सन २०१२ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला. सदर फिर्यादीनंतर तात्कालीन पोलिस उपनिरीक्षक डी. आर. कुलकर्णी यांनी या प्रकरणाचा तपास केला व जिल्हा व सत्र न्यायालय बीड येथे आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले.

 

सदर प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश – १ मा. एस.एस. घोरपडे साहेब बीड यांच्या न्यायालयात झाली. सदर आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षातर्फे एक (०६) साक्षीदार तपासण्यात आले व सदर प्रकरणात पिडीता, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्या पुरावा तसेच सहाय्यक सरकारी वकील अॅड. ए. बी. तिडके यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश – १ बीड मा. एस.एस. घोरपडे साहेब यांनी आरोपी यास भा.न्या. सं अन्य ६ महिने सक्तम कारावास व १०,०००/- दंड व दंड न भरल्यास ३ महिने सक्तम कारावास तसेच कलम १२ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा सन २०१२ अंतर्गत दोषी ठरवत ७ वर्ष सक्तम कारावास व १०,०००/- रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने सक्तम कारावास तसेच २ वर्ष सक्तम कारावास व ५,०००/- रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने सक्तम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सदर प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील अॅड. ए बी तिडके यांनी काम पाहिले. त्यांना जिल्हा सरकारी वकील अजय दि. राख यांनी मार्गदर्शन केले तसेच पैरवी अधिकारी पोलिस कॉन्स्टेबल सुरेश कदम यांनी सहकार्य केले.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles