7 C
New York
Friday, November 14, 2025

Buy now

spot_img

इंदोरीकर महाराज म्हणाले, मी आता किर्तनच करणार नाही

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या मुलीचा साखरपुडा नुकताच थाटमाटात पार पडला. संगमनेरमध्ये झालेल्या या ‘शाही’ साखरपुड्यावरुन सोशल मीडियावर टीकात्मक चर्चांना उधाण आलं आहे.

या साखरपुड्याच्या कार्यक्रमातील ‘तामझाम’वरुन ट्रोल केल्यानंतर ट्रोलर्सनी नंतर थेट इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या कपड्यांवरुन ट्रोल करण्यास सुरुवात केली. यानंतर मात्र, संतापलेल्या इंदुरीकर महाराजांनी मग थेट कीर्तनसेवाच थांबवण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला. आता महाराजांच्या ‘सपोर्ट’साठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तडफदार नेत्या रुपाली पाटील ठोंबरे  मैदानात उतरल्या आहेत.

 

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुकवर निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या समर्थनार्थ मोठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ‘इंदुरीकर महाराज राम कृष्ण हरी. तुम्ही फेटा खाली उतरवायचा नाही. महाराज तुम्ही सोशल मीडियाच्या विकृत लोकांमुळे व्यथित झालात, साहजिकच होणार. पण आपण आपल्या कर्तृत्वाने आपल्या, कामाने सिद्ध आहात. या सोशल मीडियाच्या विकृत छपरी जे माणूस नावावर कलंक आहेत, यांच्याकडे अजिबात लक्ष न देण्याचा सल्लाही रुपाली पाटील ठोंबरे यांनी महाराजांना यावेळी दिला आहे.

 

रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, आपण आपल्या वारकरी प्रबोधनातून, किर्तन आणि भजनातून समाजातील माता, भगिनी, बंधूंसाठी अत्यंत मौल्यवान कार्य केलं आहे. तेही या युगाशी समतोल साधून केलं आहे. असं त्यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे. याचवेळी त्यांनी अध्यात्मिक शांती देत आहात. त्यामुळे आपण अजिबात व्यथित होऊ नका. तुमच्यासारखे महाराज नसतील घर घरातील बिघडलेले स्त्री, पुरुष चांगल्या मार्गावर येणार कसे, त्यांना सदबुद्धी, चांगले विचार, चांगले कर्माचा रस्ता सांगणार कोण? तुम्ही फेटा खाली उतरवायचा नाही असं जबाबदारीनं इंदुरीकर महाराजांना  म्हटलं आहे.

 

तुमच्यासोबत अख्खा महाराष्ट्र आहे. तुमचे कुटुंब म्हणून तुमच्या कुटुंबतील मी लेक आहे. आमच्या भगिनींबद्दल कोण बोलत असेल तर त्या वेडी, विकृत माणसावर तुम्ही दुर्लक्ष करा. आम्ही पाहतो त्यांच्याकडे. सोशल मीडियावर वेड्याचे सोंग घेण्याकडे, त्या वेड्याचे सौंग काढण्याची सुद्धा हिंमत आहेत. त्यांची विकृती ठेचून काढू, अजिबात व्यथित होऊ नका आणि फेटा खाली ठेवायचा नाही. ही माझी आपणास लेक म्हणून विनंती आहे. फेटा खाली ठेवायचा नाही,’ असं भावनिक आवाहन रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपल्या पोस्टमधून कीर्तनकार इंदुरीकर महाराजांना केलं आहे.

 

 

इंदोरीकर महाराज काय म्हणाले?

 

कीर्तनकार इंदुरीकर महाराज म्हणाले, आम्ही किती कष्ट केले, याचा लोकं कधीच विचार करत नाही. आम्ही कसा संसार केला, हे पण त्यांना माहित नाही. आमची पोरं लहान असताना आठ-आठ दिवस माझी त्यांच्याशी गाठ नव्हती. आणि आता लोक इतके खाली गेलेत, की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे आहेत, यावरुन लोकांचे कमेंट्स आहेत. याच्यापेक्षा वाईट काय असेल?असा संतप्त सवाल महाराजांनी कीर्तनातून समाजाला केला आहे.

 

तसेच आता चार दिवसांपासून माझ्या मुलीच्या अंगातील कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्या, पण तिच्या बापाला… तुम्ही मला घोडे लावा.. माझा पिंड गेलाय… माझ्या मुलाचा आणि मुलीचा काय दोष आहे, असे उद्विग्न मत मांडत इंदुरीकर महाराजांनी सुरू असलेल्या ट्रोलिंगवरुन तीव्र नाराजी व्यक्त केलं होतं.

 

 

महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार असलेल्या निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या मुलीचा साखरपुडा नुकताच पार पडला. संगमनेरमध्ये मोठ्या थाटामाटात इंदुरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल चिलाप यांचा साखरपुडा झाला. साहिल हे बांधकाम व्यावसायिक आहेत. दरम्यान, या साखरपुड्यावर झालेल्या खर्चामुळे पुन्हा एकदा निवृत्ती महाराज इंदुरीकर हे चांगलेच चर्चेमध्ये आले आहेत

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles