बीड |
बीड जिल्ह्यातील अकरा पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण अडीच वर्षासाठी जाहीर करण्यात आले. यामध्ये बीड पंचायत समितीचे सभापती पद ओबीसीसाठी राखीव झाले आहे. तसेच आष्टी पंचायत समितीचे सभापती सर्वसाधारण महिलेसाठी तर पाटोदा पंचायत समितीचे सर्वसाधारण राहिले आहे.
बीड जिल्ह्यासह राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे आरक्षण काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी बीड जिल्ह्यातील ११ पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आरक्षण सोडत आयोजित करण्यात आली होती.
उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी आणि प्रभोदय मुळे यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली.
जिल्ह्यातील अकरा पंचायत समितीच्या सभापतींचे आरक्षण पुढीलप्रमाणे आहे.
पंचायत समिती बीड – इतर मागासवर्गीय
पंचायत समिती गेवराई – इतर मागासवर्गीय महिला
पंचायत समिती आष्टी – सर्वसाधारण महिला
पंचायत समिती शिरूर – सर्वसाधारण महिला
पंचायत समिती पाटोदा – सर्वसाधारण
पंचायत समिती परळी – अनुसूचित जाती
पंचायत समिती वडवणी – सर्वसाधारण
पंचायत समिती धारूर – इतर मागासवर्गीय महिला
पंचायत समिती माजलगाव – सर्वसाधारण महिला
पंचायत समिती अंबेजोगाई – सर्वसाधारण महिला
पंचायत समिती केज – सर्वसाधारण