बीड |
पीएनजी ज्वेलर्सने पुन्हा एकदा आपली बहुप्रतीक्षित “प्युअर प्राइस ऑफर” मोहिम सुरू केली असून १ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. ही योजना आगामी सण व लग्नसराईच्या हंगामात ग्राहकांना सोने खरेदी करताना आर्थिक दिलासा देण्यासाठी खास तयार करण्यात आली आहे.
सोन्याच्या किंमतीत सतत होणाऱ्या वाढीचा विचार करता या योजनेत ग्राहकांना त्यांच्या आवडीचे सोनं किंवा हीऱ्यांचे दागिने १ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर २०२५ या कालावधीत विद्यमान दराने प्री-बुक करण्याची संधी मिळते जर नंतर सोन्याचा दर वाढला, तरीही त्यांना आधीच्या कमी दराचा लाभ मिळतो. आणि जर दर कमी झाला, तर पीएनजी ज्वेलर्स बिलिंगवेळी कमी झालेला दर मान्य करून ग्राहकांना दिलासा देणार आहे.
या मोहिमेबाबत पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले, ‘भारतीय कुटुंबांसाठी सोनं ही केवळ गुंतवणूक नसून भावनिक आणि सांस्कृतिक दृष्टीनेही महत्त्वाची गोष्ट आहे. ‘प्युअर प्राइस ऑफर’ च्या माध्यमातून आम्हाला ग्राहकांना पारदर्शक, निश्चिंत आणि फायद्याचा खरेदी अनुभव द्यायचा आहे. हीच ग्राहक आणि पीएनजी ज्वेलर्समधील विश्वासाची जोडणी आहे.’ ‘प्युअर प्राइस ऑफर’ चा लाभ पीएनजी ज्वेलर्सच्या महाराष्ट्रातील सर्व दालनांमध्ये घेता येणार आहे.