26.8 C
New York
Monday, July 21, 2025

Buy now

spot_img

लाडकी बहीण योजना; एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांचे लाभ बंद, आता 2.50 लाखाचे उत्पन्न नसलेल्यांची पडताळणी होणार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एका कुटुंबातील दोन महिलांनाच लाभ मिळणार असतानाही तिसऱ्या-चौथ्या महिलेनेही अर्ज केले. काहींनी रेशनकार्ड वेगळे असल्याचे सांगितले, वय १८ नसताना देखील अठरा पूर्ण असल्याचे दाखवून अर्ज केले. पण, आता एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त असलेल्या लाभार्थीच्या नावापुढे ‘एफएससी मल्टिपल इन फॅमिली’ असा शेरा मारून त्यांचा लाभ बंद केला आहे. आता ऑगस्टपासून कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असलेल्या महिलांची पडताळणी होणार आहे. आत्तापर्यंत दहा लाखांपेक्षा अधिक महिलांनी लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत.

 

लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील दोन कोटी ५७ लाख महिलांनी अर्ज केले. त्यात १८ ते ६५ वयोगटातील महिला पात्र, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे, एकाच कुटुंबातील दोन महिला, लाभार्थीच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन नको, लाभार्थी दुसऱ्या वैयक्तिक योजनेची लाभार्थी नसावी, अशा अटी आहेत.

 

तरीपण, एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी, आधारकार्डवरील जन्मतारीख बदलून, कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसून वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचे भासवून योजनेच्या लाभासाठी अर्ज केले. त्या सर्वच निकषांची पडताळणी झाली असून आता प्राप्तिकर विभागाने महिला व बालविकास विभागाला माहिती दिली आहे. त्याआधारे लाडक्या बहिणींची पडताळणी होईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. ‘लाडकी बहीण’चा लाभ बंद झालेल्या अनेक महिला संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

  • ‘या’ महिलांचा झाला लाभ बंद
  • वयाची ६५ वर्षे पूर्ण झालेल्या
  • स्वत:चे किंवा कुटुंबाकडे चारचाकी वाहन
  • संजय गांधी निराधार योजनेसह अन्य वैयक्तिक योजनेच्या लाभार्थी
  • १८ वर्षे पूर्ण नसताना देखील अर्ज केलेल्या

 

तक्रार नोंदविण्यासाठी ‘हा’ पर्याय

 

लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळावर लाभ बंद झालेल्या लाडक्या बहिणींना तक्रार नोंदवण्यासाठी ‘ग्रिवन्स’ हा पर्याय दिला आहे. त्यासाठी अर्जदारास स्वत:चा लॉगिन आयडी तयार करून त्यावरून महिलांना तक्रार नोंदविता येते. याशिवाय महिला व बालविकास कार्यालयात किंवा तालुक्यातील बालविकास प्रकल्प कार्यालयांमध्ये देखील ऑफलाइन तक्रारी अर्ज देता येतो. त्याठिकाणी तक्रारींची संख्या दहा लाखांवर पोचली आहे.

 

निकषांनुसार अपात्र महिलांचा लाभ बंद होणार

 

आतापर्यंत दरमहा लाभ मिळाला पण, आता अचानक लाभ बंद झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ६५ वर्षे पूर्ण झालेल्या महिलांचा लाभ आपोआप बंद होत आहे. एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांचेही लाभ आता बंद केला आहे. लाभ बंद झालेल्यांच्या नावापुढे ‘आरटीओ रिजेक्टेड’, ‘आदर स्कीम बेनिफिशियरी’ आणि आता ‘एफएससी मल्टिपल इन फॅमिली’ असा शेरा आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles