18.5 C
New York
Saturday, April 19, 2025

Buy now

spot_img

आष्टी तालुक्यात जमावाच्या हल्ल्यात दोन सख्खा भावांचा मृत्यू!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

आष्टी |

आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे गुरुवारी(दि.१६) रात्री दहाच्या दरम्यान तीन सख्खा भावांवर त्याच्याच समाजातील काही लोकांना लोंखडी राॅड, धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात दोन सख्खा भावांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना अंभोरा पोलिस ठाणे हद्दीत घडली.अजय विलास भोसले,भरत विलास भोसले असे मयताचे नावे असून कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी आहे.

आष्टी तालुक्यातील हातोळण येथील अजय विलास भोसले, भरत विलास भोसले, कृष्णा विलास भोसले हे तिघे भाऊ वाहिरा येथे गुरूवारी आले होते. याच ठिकाणी वाहिरा गावातील व बाहेरील काही लोक जमा झाले होते.गुरूवारी दुपारपासून हे सगळे याच ठिकाणी होते.रात्री साडे नऊ ते दहाच्या दरम्यान यातील काही लोकांनी या तीनही भावांवर लोंखडी राॅड, धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यात अजय विलास भोसले, भरत विलास भोसले या दोन सख्खा भावांचा जागीच मृत्यू झाला. तर तिसरा भाऊ कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी झाला. असून त्याच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत. या घटनतेली सात संशयित आरोपीना अंभोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.हा खून का व कोणत्या कारणावरुन केला हे अद्याप समजले नाही.दोनही मृतदेह आष्टी ग्रामीण रूग्णालयात ठेवण्यात आले आहेत.

पोलिस घटनास्थळी दाखल

अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत तावरे,बाबासाहेब गर्जे, मनोजकुमार खंडागळे,भरत माने,बाबुराव तांदळे,लुईस पवार,दत्तात्रय टकले,पोलीस अंमलदार शिवदास केदार, सतीश पैठणे अमोल शिरसाठ यांनी भेट देत मोठ्या शिताफिने सात संशयित आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles