-2.6 C
New York
Friday, January 10, 2025

Buy now

spot_img

मी पुन्हा आलो! देवेंद्र फडणवीसच होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं निकाल लागून १२ दिवस झाले आहेत तरी राज्यात सरकार स्थापन झाले नाही. अशातच आज महायुतीकडून सत्तास्थापनेता दावा केला गेला. सत्ता स्थापनेचा दावा करण्यापूर्वी भाजपच्या गटनेत्याची निवड केली गेली. देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाचा नेता म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

उद्या ०५ डिसेंबर रोजी फडणवीस यांचा आझाद मैदानावर शपथविधी सोहळा होणार आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीनंतर राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस राज्याचा कारभार सांभाळतील. भाजपच्या कोर कमिटीमध्ये फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. केंद्रातून आलेल्या दोन निरीक्षकांच्या उपस्थितीत आज विधिमंडळ बैठकीपूर्वी कोर कमिटीची बैठक पार पडली.

या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला सर्व प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री पदासाठी सहमती दिली. गुजरातचे माजी मुख्यमंत्री, आदरनीय रुपणीजी, त्यांच्यासोबत आलेल्या भारताच्या वित्तमंत्री, आदरनीय निर्मला सीतारामनजी, आपले अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी माननीय विनोद तावडे, माननीय शिवप्रकाशजी, मंचावर उपस्थित असणारे सरमाननीय आशिष शेलारजी, प्रवीण दरेकरजी, भारतीय जनता पक्षाचे विधानमंडळातील माझे सर्व ज्येष्ठ सहकारी कोर कमिटीचे सर्व सदस्य यांचे देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले.

माझ्यापेक्षा भारताचं संविधान सर्वात महत्त्वाचं आहे आणि एक असं संविधान की ज्या संविधानाने प्रत्येक भारतीयाला जगण्याचा, मोठं होण्याचा अधिकार दिला आणि भारताला जगातलं एक उत्तम राष्ट्र म्हणून प्रस्थापित करण्याचं काम केलं अशा या संविधानाच्या ७५ वर्ष पूर्ण होण्याऱ्या अमृत महोत्सवी वर्षात पुन्हा एकदा सरकार स्थापन करतोय. आपण सुरु केलेल्या योजना आणि आपण दिलेली आश्वासनं ही पूर्ण करणं याच्याकडे आपली प्राथमिकता असेलचं पण त्याचसोबत महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकावर आणण्याकरता आपल्या सर्वांना या ठिकाणी आपल्याला कार्यरत राहायचं आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

उद्या ०५ नोव्हेंबर २०२४ रोजी आझाद मैदानात होणाऱ्या शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याच एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असे तीन लोकच शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या शपथविधीच्या सोहळ्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात भव्य दिव्य तयारी करण्यात आलेली आहे. या सोहळ्यात भगवा रंगाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. सोहळ्यासाठी तीन वेगवेगळे स्टेज उभारण्यात आले आहेत.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles